शेतकरी आंदोलन सुरूच राहावे अशी काहींची इच्छा; फडणवीस यांचा आरोप

Some want farmers' agitation to continue - Fadnavis alleges

मुंबई :- केंद्राने केलेले कृषी कायदे (Agriculture Law) रद्द करा, या मागणीसाठी पंजाब- हरियाणामधल्या शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers’ agitation) सुरू आहे. आंदोलनासंदर्भात  मोदी सरकारने निदर्शकांशी चर्चा सुरू केली. मात्र, आंदोलकांमध्ये एक समूह असा आहे ज्याला मार्ग नाही काढायचा. ज्यांना वाटतं आहे की, शेतकरी आंदोलनातून मार्ग निघायलाच नको. त्यांच्यामागे कोण आहे हेदेखील शोधले पाहिजे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

फडणवीस म्हणालेत, शेतकऱ्यांनी काही सुधारणा सुचवल्या. सरकारने त्या मान्य केल्या.  त्यानंतर त्यांनी सरकारकडे लेखी आश्वासन मागितले.  ती मागणीही मान्य झाली. त्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी भूमिका बदलली आणि मागणी केली. कायदेच रद्द करा. याचा अर्थ आंदोलकांमध्ये एक समूह असा आहे ज्याला मार्ग नाही काढायचा. ज्यांना वाटतं आहे की शेतकरी आंदोलनातून मार्ग निघायलाच नको. त्यांच्यामागे कोण आहे हेदेखील शोधले पाहिजे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बिहारचा विचार केला तर तेजस्वी यादव म्हणाले, आमचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. मात्र बिहारने तर APMC च रद्द केल्या आहेत! या कायद्यांमध्ये ती तरतूद नाही; तरीही ते विरोध करत आहेत! आंदोलक चुकीचे आहेत, त्यांचा मार्ग योग्य नाही असे नाही. मात्र काही लोक आहेत ज्यांना वाटते की, हे आंदोलन सुरूच राहावे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ही बातमी पण वाचा : ठाकरे सरकारचे पवारांना बर्थडे गिफ्ट ; शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत शेतकरी होणार लखपती!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER