रेल्वेकडून धुक्यामुळे काही गाड्या रद्द

नवी दिल्ली : उत्तर भारतातील पर्वतांमध्ये सततच्या होणाऱ्या हिमवृष्टीमुळे सध्या येथील मैदानी प्रदेशात थंडीसह धुक्याचं साम्राज्य पसरले आहे. याचा परिणाम रेल्वेगाड्यांवर होऊ लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच हिवाळ्यात कमी रेल्वेगाड्या धावत आहेत. तर ज्या गाड्या धावत आहेत त्या विशेष प्रवासी गाड्या असून फक्त तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांनाच यात प्रवेश दिला जात आहे. तर इतर प्रवासी गाड्या आणि आरक्षण नसणाऱ्या गाड्या बंद आहेत. तसेच ईएमयू-डीएमयू वगैरे आता चालत नाहीत. त्यामुळे उत्तर रेल्वेकडून धुक्याचा परिणाम लक्षात घेता या महिन्यासाठी काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आला आहे. तसेच याप्रकरणी चार्ट आधीच तयार केला आहे.

उत्तर रेल्वेकडून (Northern Railway) मिळालेल्या माहितीनुसार, १६ ते ३१ डिसेंबर दरम्यान एकूण ३४ गाड्या रद्द करण्यात आल्या असून २६ गाड्यांची फ्रिक्वेंन्सी कमी करण्यात येणार आहे. तर ४ रेल्वेगाङ्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द केल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये काही अशा गाड्या आहेत ज्या दररोज धावतात किंवा आठवड्यातून ५ किंवा ६ दिवस धावतात. या रद्द करण्यात आलेल्या गाड्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागेल. मात्र ज्यांनी यापूर्वीच तिकिटे आरक्षित केली आहेत. अशा प्रवाशांना भाडे परत देण्यात येईल.

धुक्यामुळे रद्द करण्यात आलेल्या गाड्या

आनंद विहार-सीतामढी, आनंद विहार-दानापूर, दिल्ली जंक्शन-मालदा टाऊन, आनंद विहार-कामाख्या, दिल्ली जंक्शन-अलीपुरद्वार, नवी दिल्ली-नवी जलपाईगुडी, डिल जंक्शन-कटिहार स्पेशल, अमृतसर-हरिद्वार, अमृतसर- जयनगर, कोलकाता-अमृतसर, अमृतसर-दिब्रूगड, अमृतसर- अजमेर स्पेशल या गाड्या रद्द करण्यात येतील.

फ्रिक्वेन्सी कमी असल्याने रद्द केलेल्या गाड्या

तर दिल्ली-आजमगड एक्सप्रेस आणि कानपूर- नवी दिल्ली स्पेशल या गाड्यांची फ्रिक्वेन्सी कमी असल्याने याही रद्द करण्यात येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER