मराठा आरक्षणाविरोधातील काही याचिका राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत; फडणवीसांचा पलटवार

Devendra Fadnavis

नागपूर : केंद्राने केलेल्या १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर तत्कालीन फडणवीस सरकारने नवीन कायदा केला होता. तोच सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नाकारला आहे. गायकवाड आयोगाचा अहवालदेखील वास्तविक इंग्रजीतच आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे खोटं बोलून राज्याची दिशाभूल करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला. मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करणाऱ्या काही याचिका राष्ट्रवादी स्पॉन्सर्ड आहेत.

राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी याचिका दाखल केल्या होत्या, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. नवाब मलिक यांना खोटं बोलण्याचा आजार झाला आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी दाखल केल्या होत्या. काही लोकांशी त्यांच्या बैठकाही झाल्या होत्या. आताच अशोक चव्हाण आणि नवाब मलिक यांची पत्रकार परिषद बघितली. मी राजकीय बोलणार नव्हतो.

मात्र, आता बोलणार आहे. ५० वर्षांत जे सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकलं नाही ते आमच्या सरकारनं दिलं होतं. मात्र भाजप सरकारनं आरक्षण दिलं, त्यांना क्रेडिट मिळू नये असं सत्ताधाऱ्यांना वाटतं असावं. हे सरकार आपली जबाबदारी झटकत आहे, हे योग्य नाही. त्यांना आरक्षण द्यावंच लागेल, असंही फडणवीस म्हणाले. चव्हाण आणि मलिक यांची मानसिकता खोटं बोल पण रेटून बोल अशी झाली आहे. हे मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. पण जनता सुज्ञ आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली तेव्हा फडणवीसांची आठवण झाली. आधी चर्चेला बोलावलं नाही.

आम्ही कायदा टिकवला होता, पण ते टिकवू शकले नाहीत. आम्ही मराठा आरक्षण योग्य समन्वय साधून टिकवलं असतं, असा दावा करतानाच मुख्यमंत्र्यांना योग्य ब्रिफिंग मिळत नसल्याचा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे. उच्च न्यायालयामध्ये अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडली होती. १०२ व्या घटनादुरुस्तीपूर्वी भाजप सरकारने हा कायदा केला होता. आम्ही त्या कायद्याला अमेंड करतोय. आम्ही हा जो कायदा केला आहे तो १०२व्या घटनादुरुस्तीने बाधित होत नाही. कारण तो कायदा घटनादुरुस्ती करण्यापूर्वीचा आहे. आता आम्ही तो फक्त अमेंड करतोय. त्यामुळे अशोक चव्हाण आणि नवाब मलिक खोटं बोलत आहेत, असा दावाही फडणवीस यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button