जास्त बोलले की आपले महत्त्व वाढेल असे काही जणांना वाटते; नवाब मलिकांचा नसीम खान यांना टोमणा

Nawab Malik & Naseem khan

मुंबई : मुंबई मनपाची निवडणूक काँग्रेसने (Congress) स्वबळावर लढावी, अशी सूचना काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नसीम खान (Naseem Khan) यांनी केली आहे. यावर खान यांना टोमणा मारताना राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले की, जास्त बोलले की आपले महत्त्व वाढेल, असे काही जणांना वाटते. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आहे.

खान यांच्या वक्तव्यावर मलिक म्हणाले की, आगामी कोणतीही निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. आपल्याला एक संघ निवडणूक लढवायची आहे, असे शरद पवारांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील तोच आग्रह धरला आहे. काँग्रेसची अंतर्गत काही चर्चा होत असेल आणि त्यांची वेगळी भूमिका असेल तर त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. सध्या अधिकृतपणे महाविकास आघाडीने कोणतीही भूमिका मांडलेली नाही.

नसीम खान यांच्यावर टीका करताना नवाब मलिक म्हणाले की, सरकार चालवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पक्षात आपली ताकद आहे असा आव आणत स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी काही वक्तव्य होत आहेत. इतरांच्या पक्षांतर्गत वादाचा आघाडीशी काही संबंध नाही. (NCP leader Nawab Malik criticize Congress leader Naseem Khan).

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER