काहींना ही दोन नावांची ॲलर्जी, शरद पवारांचा विखेना टोला

Radhakrishna Vikhe Patil - Sharad Pawar

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात विखे कुटुंबाला चांगलेच टोले लगावले आहेत. “देशातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगरमधील प्रवरा कारखानाच आहे. त्याच्या उभारणीतील पहिली दोन नावं म्हणजे अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ आणि अण्णासाहेब शिंदे (Annasaheb Shinde) ही आहेत. पण नावं घेताना काहींना अ‌ॅलर्जी होते,” असा टोला पवारांनी लगावला. विखे कुटुंबाकडून प्रवरा साखर कारखान्याचं श्रेय कायमच पद्मश्री विठ्ठलराव विखेंना देण्यात येते. मात्र, इतर नावांचा उल्लेख होत नाही, असाच पवारांचा हे बोलण्यामागील रोख असल्याचं बोललं जातं आहे.

शरद पवार म्हणाले, देशातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरचाच आहे. हा कारखाना उभा करण्यात पहिले दोन नावं म्हणजे धनंजय गाडगीळ (Dhananjay Gadgil) आणि अण्णासाहेब शिंदे यांची आहेत. पण ही नाव घेताना अनेकांना ॲलर्जी होते.

देशाच्या कृषी क्षेत्राला प्रचंड योगदान देणाऱ्या आणि सहकारी चळवळीला दिशा देणाऱ्या अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने संबंध वर्षांत विविध विषयांवर विविध चर्चासत्रे चालवावीत. या संकल्पनेची आम्ही आज सुरुवात करत आहोत. अण्णासाहेब शिंदे आणि चव्हाण प्रतिष्ठानचा घनिष्ठ संबंध आहे. संस्थापकांच्या यादीमध्ये आपल्याला त्यांचं नाव बघायला मिळेल. सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष म्हणून काहीकाळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि विविध प्रकारच्या बैठकांना नेतृत्व देण्याचं काम त्यांनी केलं, असंही पवारांनी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांचे ‘ते’ शब्द प्रविण दरेकरांच्या जिव्हारी लागले! दरेकरांचे पवारांना पत्

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER