आमचीच काही लोक बाहुले बनून परीक्षा घेण्यास संमती देत आहेत : विनायक मेटे

Vinayak Mete

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) (MPSC) वतीने दि. ११ ऑक्टोबर, १ नोव्हेंबर व २२ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या परीक्षा पुढे ढकला व उमेदवारांची वयोमर्यादा वाढवा याबाबत येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्वरित निर्णय घ्या. आमचीच काही लोक बाहुले बनून परीक्षा घेण्यास संमती देत आहेत. या मुद्द्यावर कोणीही राजकारण करू नये, असे मत आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी मराठा विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत केले.

यावेळी अनुप देशमुख, परम बिराजदार, अर्चना पाटील, विक्रम गायकवाड, पूजा झोळे उपस्थित होते. महाराष्ट्र सरकार आणि एमपीएससी यांना शेवटचा इशारा देत असून त्यांनी परीक्षा पुढे ढकलली नाही तर ९ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

मेटे म्हणाले, कोरोनाच्या सुरवातीच्या काळात परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. परंतु आता कोरोना वाढलेला असतानाही परीक्षा घेत आहेत. आयोगामार्फत परीक्षा पुढे ढकलण्याऐवजी महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या मुलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. मंत्रालयातील काही लोकांनी हा कट शिजवलेला असून त्यांच्यामुळे ही परीक्षा होत असल्याचा आरोप ही मेटे यांनी यावेळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER