टॅप केलेले काही फोन मुख्यमंत्र्यांनीही ऐकले होते; फडणवीसांचा दुसरा दावा

Devendra Fadnavis

मुंबई :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कथित पोलीस बदली रॅकेट प्रकरणी त्यांच्याकडे असलेले सर्व पुरावे आज केंद्रीय गृह सचिवांकडे सोपवले. आज सकाळी देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्यात पोलीस बदली रॅकेट झालं असून त्याचे फोन टॅपिंग इंटरसेप्ट्सदेखील आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. त्यानंतर सायंकाळी त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृह सचिवांची भेट घेऊन त्यांना सर्व पुरावे सादर केले. या सर्व प्रकरणाची सीबीआयमार्फत (CBI) चौकशी करण्याची मागणी केली. आता याबाबत लवकरच निर्णय होईल. तसेच, गरच पडल्यास या प्रकरणी कोर्टात जाण्याचाही इशारा दिला. दरम्यान, डीजीपींनी सरकारला सादर केलेले काही इंटरसेप्ट्स कॉल स्वत: मुख्यमंत्र्यांनीदेखील ऐकले होते, अशी माझी खात्रीशीर माहिती आहे, असा दावाही त्यांनी केला.

महाराष्ट्रात पोलिसांच्या बदल्यांचं रॅकेट सुरू असून यासंदर्भातील कॉल रेकॉर्डिंग आणि इतर सबळ पुराव्यांसकट एक अहवाल तत्कालीन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी राज्य सरकारला दिला होता. पण त्यावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळेच हे सारे पुरावे आता केंद्रीय गृह सचिवांना दिले आहेत, असं फडणवीस म्हणाले.

केंद्रीय गृह सचिवांनी माझं सर्व बोलणं ऐकून घेतलं आणि सर्व पुराव्यांची पडताळणी करून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिलं आहे. राज्य सरकार कुणाला वाचवतंय? पोलिसांच्या बदली संदर्भातील रॅकेट चालवलं जात असल्याचा अहवाल २५ ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडे देण्यात आलेला असतानाही त्यावर अद्याप कोणतीच कारवाई सरकारनं का केली नाही? त्या अहवालावर काहीच कारवाई न करता सरकार नेमकं कुणाला वाचवू पाहातंय? असा सवाल फडणीस यांनी यावेळी उपस्थित केला.

ही बातमी पण वाचा : सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे गंभीर प्रकरणावर पांघरून? फडणवीसांचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER