आदित्य ठाकरे, धनंजय मुंडेंसह १५ मंत्र्यांना वीज बिलच नाही; ठाकरे सरकारचा प्रताप माहिती अधिकारातून उघड

AAditya Thackeray & Dhananjay Munde

मुंबई : राज्यातील १५ मंत्र्यांना गेल्या चार-पाच महिन्यांची वीज बिलं दिली गेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून याबाबत खुलासा झाला आहे . लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांना भरमसाट रक्कम आकारून वीज बिल पाठवण्यात आले आहे . कोरोनाच्या संकटात गेल्या पाच महिन्यांत  वीज बिल भरताना सर्वसामान्यांच्या नाकीनऊ आले होते. आधीच लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही, त्यात भलमोठं विजेचं बिल पाहून सर्वसामान्यांच्या संकटात भर पडली होती. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर याबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या नोकरदार सर्वसामान्य नागरिकांना बसला.

मात्र आरटीआयमधून मंत्र्यांच्या बिलांबाबत माहिती समोर आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे . बड्या मंत्र्यांना विजेचे  बिल का पाठविण्यात आले नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. माहितीनुसार , या प्रकरणात आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी लोक निर्माण विभागाकडून मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलैमध्ये राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या वीज बिलाबाबत माहिती विचारली. लोक निर्माण विभागातील दक्षिण उप-विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमघ्ये विजेचे बिल पाठविण्यात आले नाहीत.

उपलब्ध कागदपत्रांनुसार १५ मेपासून पाच मंत्र्यांना गेल्या पाच महिन्यांपासूनची विजेचं  बिल पाठविण्यात आलेले नाही. यामध्ये दादाजी भुसे, केसी पाडवी, अमित देशमुख, हसन मुश्रीफ आणि संजय राठौड यांची नावे आहेत. तर गेल्या चार  महिन्यांपासून जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, वर्षा गायकवाड, गुलाबराव पाटील, संदीप भुमरे, अनिल परब, बाळासाहेब पाटील यांना  विजेचे बिल पाठविण्यात आले नसल्याची माहिती आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER