प्रत्येक आपत्तीत राजकारण करण्याचा काही नेत्यांना महारोग; आशिष शेलारांचे टीकास्त्र

Ashish Shelar

मुंबई :  तौक्ते  चक्रीवादळामध्ये (Tauktae cyclone) समुद्रकिनाऱ्यापासून १७५ किमी अंतरावर P-305 बार्ज बुडाले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आता ६१ झाली आहे. या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या प्रकरणी केंद्रातील मंत्र्याचा राजीनामा मागितला आहे. त्यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांना प्रत्येक आपत्तीत राजकारण करण्याचा महारोग झाला आहे, असे शेलार (Ashish Shelar) म्हणाले आहेत . ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ही बातमी पण वाचा:- बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक एकनाथ शिंदे , उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावे : नितेश राणे

भाजपच्या अखिल भारतीय नाविक संघाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मीही त्यांच्यासोबत होतो. आम्ही मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन बार्ज ‘पी-305’च्या दुर्घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. या दुर्घटनेतील दगावलेल्या ८० लोकांचे मृतदेह सापडलेले नाहीत किंवा मृतांचा आकडाही समोर आलेला नाही. या घटनेची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यातून दुर्घटनेला कोण जबाबदार आहे, ते कळून येईल,असेही शेलार म्हणाले.

कॅप्टन राकेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. राज्य सरकार आणि पोलीस खऱ्या गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करतानाच चौकशी भरकटली पाहिजे अशी भूमिका सरकारने घेतली आहे का? असा सवाल शेलार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासमोर उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button