ठाकरे सरकार सत्तेत येऊ नये यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनी काम केले – सामना

SAmna

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे ८० तासांचे सरकार कायम रहावे यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते, असा दावा शिवसेनेचे मुखपत्र सामनाने केला आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, याआधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनीही – काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार उलथवण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा केला होता पण, नंतर त्यांनी ‘मी तसे म्हटलेच नाही’ अशी पलटी मारली होती.

सामानाने म्हटले आहे की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक अधिकाऱ्यांना वाटले होते की, फडणवीस यांचे सरकार पुन्हा सत्तेत येईल. भाजपाचे १०५ आमदार असताना ते सरकार स्थापन करू शकणार नाही, असे कुणालाही वाटत नव्हते.

राज्यात राष्ट्रपती शासन लागू होण्याच्या आधी, सकाळी स्थापन झालेल्या फडणवीस यांच्या सरकारला अनेक अधिकाऱ्यांनी मदत केली होती. ते सरकारचा समर्थनात आमदार गोळा करण्याचे काम करत होते. यात गुप्तचर विभागही सहभागी होता, असा दावाही सामनाने केला आहे.

त्याचवेळी सामनाने असाही दावा केला आहे की, राज्याचे प्रशासन कुशल आहे. त्यांना कोणतेही सरकार स्थापन करण्याचा किंवा उलथवण्याचा अधिकार नाही. अशी महाराष्ट्राची संस्कृती नाही.

काही अधिकारी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे काही मंत्र्यांना वाटत असेल तर, या सरकारचा पाया ठिसूळ आहे, असा चुकीचा संदेश यातून यातून जनतेत जातो, असे संपादकीयात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER