कोविड पेशंटकरिता उपयुक्त काही पथ्य आहार !

Some dietary supplements for covid patients - Maharastra Today
Some dietary supplements for covid patients - Maharastra Today

कोविड झाला की पेशंटला भूक लागत नाही तसेच जिभेला चव नसते. त्यामुळे रोजचा आहार खाऊ शकत नाही, अशी तक्रार पेशंट करत असतात. अशा वेळी काही पथ्यकर आहाराची गरज असते. जेणेकरून अशक्तपणा, आजार, लक्षणे दूर होतील. लंघन करणे ही ताप आला की प्रथम चिकित्सा आहे. प्रथम लंघन, लघु आहार, उकळून कोमट झालेले पाणी, सुंठीचा काढा, षडंगोदक आहार म्हणून सेवन करावे. आयुर्वेदात (Ayurveda News) पथ्यकर आहार हा आजारानुसार बदलल्या जातो. जेणेकरून आहाराद्वारे चिकित्सेला मदत मिळते. बघूया अशा काही पथ्यकर रेसिपी ज्या ताप असल्यास देता येतील.

पेया – मण्ड, पेया हे सुपाच्य पेय आहेत. तांदळाच्या १४ पट पाणी घालून उकळल्यास तांदूळ शिजल्यावर हे मण्ड गाळून घेतात. तांदळाची पेज म्हणू शकतो यात सुंठ, मिरे, पिंपळी सैंधव घालू शकतो. ही पेज अग्निदीपक (भूक वाढविणारी), पचायला हलकी, दोष – मल – घाम यांना शरीरातून बाहेर काढणारी हितकर आहे. झोप न येणे, पोट साफ न होणे या लक्षणांमध्ये या पेयामध्ये आवळा, सुंठ घालावे.

लाजापेया – साळीच्या लाह्या गरम पाण्यात उकळून गाळावे. यात सुंठ, धनेपूड, पिंपळी, सैंधव, अनारदाणा घालून पिण्यास द्यावे. यूष / सूप – ज्यांना कफ खूप जास्त संचिती असेल त्यांना कुळीथ किंवा चणाडाळीचे सूप अनारदाणा मिरेपूड, सुंठ, सैंधव घालून द्यावे. यात तेल वा तुपाची फोडणी देऊ नये. हे रुचकर करून कफ अधिक असल्यास द्यावे.

यव सातू – ताप आणि कफ अधिक असल्यास तूषरहित (सालरहित) यव धान्य भाजून त्याचा भात त्यावरील मांड काढून द्यावा. मूग, कुळीथ या डाळीचे सूप लघु, सुपाच्य, ज्वरनाशक असतात. यात जिरे, हिंग, सैंधव यांचा वापर करावा. मूग-तांदळाची पातळ खिचडी याप्रमाणे करू शकतो. भूक जाणवायला लागली की हळूहळू भाकरी, खिचडी, फळभाजी अशी सुरू करावी, जेणेकरून अशक्तपणा येणार नाही.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button