आयुर्वेदात वर्णिलेल्या काही पथ्य रेसिपी !

Ayurveda

आयुर्वेदात (Ayurveda) आजारात घेण्याकरीता काही पथ्यकर आहार रेसिपी सांगितल्या आहेत. यातील घटक द्रव्य आजार कमी करणारे शिवाय त्या अवस्थेत चालणारे आहार्य द्रव्य वापरले जातात. अशाच काही रेसिपीज बघूया –

१) सप्तमुष्टिक यूष –

साहित्य – कुळथी डाळ, यव (जौ), बोरकूट, मूगदाळ, मूळ्याचे तुकडे, आलं धणे पावडर.

यात ७ घटक द्रव्य आहेत व १-१ मूठ (मुष्टि) प्रमाण घेऊन हे सूप बनवितात म्हणून त्याचे नाव सप्त मुष्टिक यूष आहे. कुळीथ यव मूगदाळ भिजत घालावे. मिक्सरवर याला भरड दळून १४ पट पाण्यात शिजवावे. शिजतांना यात बोरकूट, आलं धणे पावडर घालावे. सैंधव मीठ चवीनुसार घालावे. हे सूपाप्रमाणे पातळ असायला पाहिजे. यावर तूप जीऱ्याची फोडणी देऊ शकता.

हे सप्तमुष्टीक यूष ज्वर, आमवात, घसा खराब होणे, तोंड चिकट वाटणे यासारख्या तक्रारींवर देण्यात येते.

२) खर्जुरादि मंथ

साहित्य – खजूर, डाळींबाचे दाणे, मनुका, चिंच, आवळा, फालसा

प्रत्येक द्रव्य सम प्रमाणात घ्यावे. पाण्यात भिजवून ठेवावे. नरम झाले की मिक्सरमधे चटणीप्रमाणे बनवावे. या चटणीच्या ४ पट पाणी घालून सरबता प्रमाणे तयार करावे. गाळून हे सरबत प्यायला द्यावे.

स्वस्थ व्यक्ती सुद्धा हे सरबत घेऊ शकतो. ज्यांना नाक फुटणे, शरीरातून रक्तस्त्राव होणे असे आजार आहेत त्यांच्याकरीता रक्त वाढविणारे, ताकद देणारे सरबत आहे. अति मद्यपान (हँगओव्हर) केल्याने होणाऱ्या तक्रारींवर हे उत्तम काम करते. अर्धा ते एक कप सरबत घेऊ शकतो. यात साखरेची तशी गरज पडत नाही. गरज पडल्यास टाकू शकतो. हे सरबत स्टीलच्या भांड्यात करावे. अल्यूमिनियम पितळ तांब्यांच्या भांड्यात करू नये.

३) मसूर सूप

Masur Soopसाहित्य – सुंठ, बेल फळाचा गर, मसूरदाळ

मसूर भिजवावी. पूर्णपणे फुगल्यावर मिक्सरवर भरड दळून पाणी घालून उकळवावे सूप बनले की त्यात सैंधव – सुंठ चवीपुरते,थोडा बेलफळाचा गर घालावा. हे सूप अपचन ग्रहणी, आव पडणे, अतिसार अशा तक्रारींवर उत्तम सूप आहे.

४) धान्यकादि हिम

हिम या शब्दावरून लक्षात येईल की हे थंड सरबता प्रमाणे कृती आहे. थंड म्हणजे फ्रीजमधील नव्हे तर माठातील पाण्याप्रमाणे थंडावा देणारे.

साहित्य – आवळा, धणे, मनुका, पित्तपापडा ( एक द्रव्य – आयुर्वेद दुकानात मिळते)

सम प्रमाणात. साधारण १-१ चमचा. सर्व घटक द्रव्य घेऊन १ पेला पाण्यात भिजववावे. रात्रभर भिजवावे. सकाळी मिश्रण घोळून ते गाळावे. हे गाळलेले धान्यकादि हिम ताप, उष्णता कमी करणारे, वारंवार तहान लागणे, तोंड कोरडे पडणे, लघवी करतांना आग होणे अशा तक्रारी दूर करणारे आहे.

अशा अनेक रेसीपी आजारानुसार आयुर्वेदात सांगितल्या आहेत.

ह्या बातम्या पण वाचा :

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER