काही कोंबडींच्या अंड्याचा बलक हिरवा !

Egg

मलापुरम (केरळ) : सामान्यतः कोंबडीच्या अंड्याचे कवच पांढरे आणि आतील भाग (बलक) पिवळा असतो. मात्र सध्या सोशल मीडियावर हिरव्या रंगाचे बलक असलेल्या कोंबडीच्या अंड्यांचा फोटो व्हायरल होतो आहे. हे फोटो आहेत केरळमधील मलापुरमच्या ए. के. शिहाबुद्दीन यांच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबडींच्या अंड्याचे !

त्यांच्या फार्ममधील कोबंड्या हिरव्या रंगांचे बलक असलेली अंडी देत आहेत.

शिहाबुद्दीन यांनी सांगितले की, ९ महिन्यांपूर्वी एका कोंबडीने हिरवे बल्क असलेले अंडे दिले. ते अंडे आम्ही खाल्ले नाहीत, उबवले. पिल्लांची वाट पाहिली. या अंड्यांमधून बाहेर आलेल्या ६ पिल्लांनी देखील हिरव्या बलकाचे अंडे देणे सुरू केले. नंतर आम्ही ही अंडी खाणे सुरू केले. त्यांची चव इतर सामान्य अंड्यांसारखीच आहे.

या अंड्यांची माहिती मिळाल्यानंतर केरळ पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान यूनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी शिहाबुद्दीन यांच्या फार्मला भेट दिली. काही चाचण्या केल्या. पोल्ट्री सायन्सचे असिस्टंट प्रो. डॉ. एस शंकरलिंगम म्हणाले की, ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. या कोबड्यांना खाण्यासाठी देण्यात आलेल्या धान्यामुळे कदाचित हे झाले असावे. मात्र शिहाबुद्दीन यांनी सर्व कोबड्यांना एकच खाद्य देत असल्याचे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला