तळेगावातील सोमाटणे टोलनाक्याला विरोध; राज ठाकरेंची भेट घेण्यास स्थानिक ‘कृष्णकुंज’वर

Raj Thackeray

मुंबई :- तळेगावच्या सोमाटणे (Talegaon Somatane) भागातील विविध पक्षांचे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीसाठी ‘कृष्णकुंज’वर पोहचले आहेत. २१ तारखेला उग्र आंदोलन करणार असल्याची माहितीही या सदस्यांनी दिली.

गेली १५ वर्षे सोमाटणे भागातील स्थानिक रहिवासी टोलनाका बंद करण्याची मागणी करत आहेत. पण कंत्राट ११ वर्षांसाठी दिल्याचं सांगत प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप आहे.

कोरोना (Corona) काळात पुन्हा एकदा नवे कंत्राट देण्यात आले आणि ते आयआरबीने जिंकले. त्यामुळे हा टोलनाका बंद करा, या मागणीसाठी नागरिकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

राज ठाकरे यांनी आयआरबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि उद्यापर्यंत माहिती देण्यास सांगितले.

ही बातमी पण वाचा : रात्री 10च्या सुमारास टोलनाक्यावर भली मोठी रांग ; फास्टॅगवरून मनसे नेत्या रुपाली पाटील भडकल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाही बातमी पण वाचा :

MT LIKE OUR PAGE FOOTER