राजहट्ट अन् बालहट्टासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मेट्रो कारशेडची जागा बदलली ; भाजप नेत्यांचा आरोप

Kirit Somaiya

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मेट्रो कारशेड (Metro-car-shed) आणि कांजूरमार्ग याबाबतही सविस्तर भाष्य करताना विरोधकांना प्रत्युत्तर दिले . तसेच भाजपाच्या (BJP) इतर नेत्यांनीही उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर टीका केली. आता, माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.

ही बातमी पण वाचा : बाळासाहेब सानपांच्या प्रवेशानं भाजपची डोकेदुखी वाढली! अनेक नगरसेवक रामराम ठोकणार?

सोमय्यांनी आपल्या ट्विटमध्ये कांजूरमार्ग येथे प्रकल्प हलविल्यानंतर या प्रकल्पाला चार  वर्षे उशीर होणार हे उद्धव ठाकरेंना माहिती होते, तरीही हा घाट घालण्यात आल्याचे ते म्हणाले . कांजूरमार्गची जागा न्यायालयीन वादात आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या समितीनेच दिलेल्या अहवालातून स्पष्ट सांगण्यात आले आहे की, मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्गला हलविल्यास चार वर्षांचा विलंब होईल. तरीही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केवळ बालहट्ट आणि राजहट्टासाठी हा प्रकल्प कांजूरमार्गला हलविण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER