ठाकरे सरकार आणि प्रताप सरनाईकांविरुद्ध सोमय्यांनी दाखल केली लोकायुक्तांकडे याचिका

Kirit Somiya - Pratap sarnaik

मुंबई :- ठाकरे सरकार आणि शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांच्या गैरव्यहारांविरोधात भाजपाचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लोकायुक्तांकडे ५३ पानांची याचिका दाखल केली.

सरनाईकांनी ११ कोटींऐवजी फक्त २५ लाख रुपये दंड भरला!

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कंपनीने २००४ साली बांधलेल्या विहंग गार्डनमधील दोन इमारती अजून अनधिकृत आहेत. या इमारतींना अद्याप OC मिळालेली नाही. गेल्या १३ वर्षांत याबाबत प्रताप सरनाईक यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही. त्यांनी ११ कोटींऐवजी फक्त २५ लाख रुपये दंड भरला आहे. भाजपाने हा विषय उचलल्यानंतर आता ठाणे महापालिकेने त्यांची फाईल रोखली आहे. मात्र, ठाकरे सरकार प्रताप सरनाईक यांना पाठीशी घालते आहे, असा आरोप सोमय्या यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांच्या जमीन व्यवहाराची चौकशी करण्याची मागणीही किरीट सोमय्या सातत्याने करत आहेत. याचिकेत याबाबतही माहिती देण्यात आली आहे.

बुधवारी भाजपाचे आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या कोरलाई येथील जमीन व्यवहाराची चौकशी करा, या मागणीसाठी उद्या (बुधवारी) अलिबागला भाजपा आंदोलन करणार आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली. या जमीन व्यवहार प्रकरणात सोमय्या यांनी १ फेब्रुवारीला कर्जत तहसीलदार यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात कर्जतमधील जमिनीची अपूर्ण माहिती दिली, असा सोमय्या यांचा आरोप आहे.

रश्मी उद्धव ठाकरे यांनी कर्जतमध्ये आठ एकर जमीन घेतली. भाऊ पाटणकर यांच्याकडून बहीण रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी जमीन विकत घेताना मध्ये बोगस बेनामी नाव का? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. बहिणीने भावाकडून जमीन घेताना दोन बोगस बेनामी नावे दिली! ही कमाल उद्धव ठाकरेच करू शकतात. उद्धवसाहेब जबाव दो, असे आव्हान सोमय्या यांनी दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER