पवारांनी केलेल्या राम मंदिराच्या तुलनेवरून सोमय्या नाराज

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी राम मंदिराची तुलना बाबरी मशिदीसोबत केल्यामुळे खेद वाटत असल्याचे भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी लेनची संख्या वाढवा – एकनाथ शिंदे

मोदी सरकारने मशिदी बांधण्यासाठी ट्रस्ट स्थापन करावा, अशी मागणी लखनौत झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी केली होती. राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट बनविता येतो, तर मशीद बांधण्यासाठी ट्रस्ट का नाही? असा सवाल पवार यांनी केला होता. त्यावर बोलताना आज गुरुवारी किरीट सोमय्या म्हणाले, राम जन्मभूमीवर रामाचे भव्य मंदिर व्हावे ही, या देशातील सव्वाशे कोटी जनतेची भावना आहे. सर्वोच्च न्यायालयानेही निर्देश दिले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मुस्लिमांसाठी वेगळे काही करायचे असेल, तर ते त्यांनी करावे, मात्र, रामाची तुलना बाबरसोबत केल्यास ते कधीच मान्य होणार नाही.