मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे, ही आपली भूमिका

सुभाष पाटील यांनी केली पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट.

Subhash Patil

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, ही आपली भूमिका आहे. मराठवा‌ड्याच्या पाणी प्रश्नावर मी, ग्रामीण भागामध्ये दौरा करणार आहे. शिवाय लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी करणार आहे. मराठवाड्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मराठवाडा विकास सेनेचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

पुढे ते म्हणाले, ग्रामीण भागात लोकांना प्यायला पाणी नाही. या शहराची तीनशे कोटींची योजना केवळ खैरें मुळे १६०० कोटींवर गेली. या शहराला आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त पाण्याचा भार द्यावा लागत आहे. तो खैरेंमुळे आणि हे सगळं होतांना खासदारकी गेली म्हणून खासदार आमदारकी मिळवण्यासाठी पाणी परिषद घेतली आहे. जो माणूस आपल्याला पाणी देऊ शकत नाही, आपल्या गल्लीत पाणी देऊ शकत नाही, तो आता काहीच करू शकत नाही.

वारीस पठाण यांच्यावर कारवाई करण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी

२० वर्षे खासदार, ५ वर्ष आमदार, मंत्री, नगरसेवक राहिलेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे नोटंकीबाज आहेत. ज्यांना लाेकांनी नाकारले त्यांनी नौटंकी बंद करावी अशी टीका त्यांनी यावेळी केली.