सोलापुरात राजकीय भुकंप ; शिवसेनेच्या महेश कोठेंसह एमआयएम चे तौफिक शेख राष्ट्रवादीच्या वाटेवर

mahesh-kote-and-mim-leader-taufiq-shaikh-may-join-ncp.jpg

मुंबई : सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे . सोलापूर महानगरपालिकेचे (Solapur Municipal Corporation) विरोधी पक्षनेते महेश कोठे (Mahesh Kote) आणि एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख (Tawfiq Sheikh) हे दोघेही राष्ट्रवादीचे वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही नेत्यांचे पक्षप्रवेशामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी ताकद वाढणार असल्याचे दिसते .

तर काँग्रेस, शिवसेना, आणि बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या वाटेवर असणाऱ्या महेश कोठेचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होणार का ? यासंदर्भात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत .

महेश कोठे हे सध्या शिवसेनेत असून काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांचे निष्ठावंत असलेले स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांचे ते चिरंजीव आहेत. कोठे यांनी 2014 मध्ये काँग्रेसला रामराम करत सोलापुरातील शहर मध्य मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. तर 2019 मध्ये शिवसेनेने तिकीट नाकारल्याने शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करत शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. त्यामुळे महेश कोठे हे काँग्रेस, शिवसेना करत आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे .

तर दुसरीकडे एमआयएमचे तौफिक शेख राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत. या दोघांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादीची महानगरपालिकेतील आणि पक्ष संघटनेची ताकद वाढणार आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER