सौर उर्जेवर चालणारी शीतगृह शेतकऱ्यांसाठी ठरतायेत संजीवनी!

Rochak Mahiti-Maharashtra Today

शेतकऱ्यानं (Farmers) शेतात पिकवलेल्या मालाला सुव्यस्थित ठेवण्याची प्रभावी यंत्रणांचा अभाव आहे. यामुळं मोठ्या नुकसानीला शेतकरी तोंड देतात. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळं लॉकडाऊन (Lockdown) लागलं आणि याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. बाजारात वेळेत पोहचू शकत नसल्यामुळं शेतकऱ्यांचा शेतीमाल खराब झाला. परंतू राजस्थानच्या अजमेरमधील शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या संवर्धनासाठी विशेष तंत्रज्ञान विकसित केलंय याचा फायदा महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना होऊ शकतो. अजमेरच्या पिचोलिया गावच्या शेतकऱ्यांनी शेतीमाल संवर्धनासाठी असंच तंत्रज्ञान विकसित केलंय. ‘भारतीय कृषी संशोधन संस्था’च्या मदतीनं एक खास प्रकारचं शीतगृह बनवण्यात आलंय.

या शीतगृह अंतर्गत शेतकरी आपआपली पिकं डाळी, फळं, भाज्या, अंडी इत्यादी स्टोअर करु शकात. या तंत्रज्ञानाचा विकास भारतीय कृषी संशोधन संस्थेमधली प्रभारी वैज्ञानिक ‘डॉ. संगिता चोप्रा’ (Dr. Sangita Chopra) आणि त्यांच्या टीमनं केलाय. अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातले संशोधकांच सुद्धा योगदान या कामात लागलंय. याबद्दल डॉ. चोप्रा सांगतात की शेतकऱ्यांना कृषीमालासाठी योग्य संवर्धन यंत्रणा बनवणं हा त्यांचा उद्देश होता.

याआधी त्यांनी बाष्पीभवनावच्या उर्जेवर शीतगृहांची निर्मिती केली होती. राजस्थान आणि पंजाबच्या गावांमध्ये या यंत्रणा सुरु करण्यात आल्या होत्या. या तंत्रज्ञानाला अजून सुव्यवस्थित बनवता येण्याची शक्यता होती. या संशोधनासाठी त्यांनी २०१५ साली शितगृहाच्या तंत्रज्ञनाच्या विकासासाठी ‘युनायटेड स्टेट्स एजेंसी फॉपर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ या संस्थेकडून संशोधनासाठी लागणारं अनुदान मिळवलं.

५३ वर्षीय वैज्ञानिक संगिता चौप्रा यांनी हा अभिनव उपक्रम सत्यात उतवून दाखवला. ऑफ ग्रिड आणि बॅटरी रहित शितगृहाच्या सुविधेबद्दल त्यांनी संशोधन केलंय.यासाठी बाष्पिभवन शितलीकरण आणि सोलर रेफ्रिजरेशन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आलाय. यासाठी १० फुट लांब, १० फुट रुंद आणि १० फुट उंच शीतगृहचा उपयोग करण्यात आलाय. पुर्णपणे सौर्यउर्जेवर ही शितगृह काम करतात. याच्या छतापवर पॅनेल बसवण्यात आलेत. या शितगृहात पाच किलोव्हॅट उर्जेचा वापर १.२ टन एअर कंडीशनर चालण्यासाठी केला जातो. दिवसा याचं तापमान ३ ते ४ डीग्री सेल्सिअस असतं तर रात्री आठ ते दहा डिग्री सेल्सिअस तापमान शितगृहात ठेवलं जातं.

सामुहिक स्तरावर शेतकऱ्यांच्या गटासाठी हे तंत्रज्ञान प्रचंड फायदेशीर ठरु शकतं. या तंत्रज्ञानाचा वापर आता संपुर्ण भारतात व्हायला सुरुवात झालीये. डॉ. संगिता यांच्या पुढाकारामुळँ शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या निकालात निघलीये. दिल्लीच्या मेला मैदानावर सुद्धा अशा प्रकारचं शितगृह उभारण्यात आलंय. कॉंक्रेट बांधकामाच्या ऐवजी मेटल फ्रेम्स आणि प्लेट्स वापरण्यात आलेत. वेगवेगळ्या जागांवर जाऊन हा सेटअप जशाच्या तसा उभा करता येतो.

एक युनिट उभारण्यासाठी किती खर्च येऊ शकतो

एक युनिट बनवण्यासाठी साधारणपणे साडेचार लाखांपर्यंतचा खर्च येतो. शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान प्रचंड फायद्याच आहे. शेतकऱ्यांच उत्पन्न वाढवण्यात ही यंत्रणा उपयुक्त ठरु शकते. मागच्या वर्षी मार्चमध्ये ज्या शेतकऱ्यांनी शितगृह उभारली होती त्यांचा मोठा फायदा झाला. १० – १५ दिवसांसाठी फळ भाज्या स्टोअर करुन ठेवण्यासाठी याचा वापर होतो. सात दिवसांसाठी भाजीपाला जसाच्या तसा राहतो. यामुळं विक्रीची साखळी तुटली तरी शेतीमाल वाया जात नाही. त्याचे सुव्यवस्थित जतन केले जाते.

पुढची योजना काय?

कृषी अभियांत्रिकी संस्थेचे प्रमुख इंदर मानी यांनी स्पष्ट केलंय की अधिकांश शेतकऱ्यांच्या हातापर्यंत हे तंत्रज्ञान पोहचवायचे आहे. यासाठी पुर्ण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. दरवर्षी ४० टक्के शेतीमाल साठवण्याची योग्य यंत्रणा नसल्यामुळं वाया जातो. बाजारपेठा बंद असतील किंवा इतर कारण असतील शेतीमाल वेळात विकला गेला नाही तर तो वाया जातो यामुळं शेतकऱ्याची प्रचंड हानी होते. शेतीमाल विकला गेला तरी त्याचे दर पडतात. अशा प्रकारच्या शीतगृहांची शेतकऱ्यांना गरज आहे. यासाठी अनुदान जाहीर झाले तर अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल. यासाठी अनेक कृषी विषयक जाणकार प्रयत्नशील आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button