राष्ट्रवादी पाणी चोर ; सोलापूरचे पाणी आधी बारामती, आता इंदापूरला पळवले; भाजप नेत्याचा हल्लाबोल

Maharashtra Today

मुंबई : भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे . सोलापूरचे हक्काचे पाणी आधी बारामती (Solapur’s water first ran to Baramati) आणि आता इंदापूरला पळविण्यात आल्याने भाजपचे आमदार राम सातपुते (Ram Satpute0 प्रचंड संतापले आहेत.

राम सातपुते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , सोलापूर जिल्ह्याचं हक्काचं पाणी आधी बारामतीला आता इंदापूरला पळवलं आहे.सत्तेच्या जोरावर घेतलेले अत्याचारी निर्णय फार काळ टिकत नसतात. राष्ट्रवादी काँग्रेस पाणी चोर हेच समीकरण आहे. आता संघर्ष करू, पण सोलापूरच हक्काचं पाणी चोरू देणार नाही, असा इशारा सातपुते यांनी दिला आहे.

दरम्यान सांडपाण्याच्या नावाखाली सोलापूरच्या उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उजनीतून पाणी उचलून इंदापुरात नेण्यासाठी लाकडी निंबोळी योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्तक्षेपामुळेच हे पाणी वळवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्याला सोलापूरकरांनी विरोध केला आहे. या कृताचा निषेध म्हणून सोलापुरात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पाणी बचाव संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीने येत्या 1 मे रोजी सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी पळवल्याने जिल्ह्यातील उसाचे क्षेत्रही निम्मे कमी होऊ शकते. या विरुध्द जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार व आमदारांनी या निर्णयाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button