उजनीच्या पाण्याचा संघर्ष पेटला; शरद पवारानंतर अजित पवारांच्या घराची सुरक्षा वाढवली

मुंबई : उजनी धरणाच्या (ujani-water-disuputes) पाण्यावरून सध्या पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात संघर्ष विकोपाला गेला आहे . यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सहयोग सोसायटी घराच्या बाहेर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून पोलीस सतर्क झाले आहेत.

उजनीच्या पाणी वाटपावरून सोलापुरातील काही शेतकरी बारामतीत आंदोलन करण्याच्या तयारीत होते. त्याआधीच पोलिसांना ३ जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे पोलिसांनी पवारांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. मागील काही दिवसांपासून दोन्ही बाजूंकडून शेतकरी संघटना आक्रमक होत असल्याने उजनीचा पाणी प्रश्न पेटला आहे. इंदापूर तालुक्यासाठी ५ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला त्यावरून हा संघर्ष सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button