सुशीलकुमार शिंदें यांना बहुजन-वंचितांनी दिला फटका

Sushilkumar Shinde,shivacharya

सोलापूर : मोदी लाट २०१४ मध्ये होती त्यावेळी सोलापुरातून नवख्या शरद बनसोडेकडून सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत देखील शिंदे यांचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवाला भाजपचे स्वामी असले तरी बहुजन ‘फॅक्टर’ अधिक प्रभावी ठरल्याचे बोलले जाते.

ही बातमी पण वाचा : भाकीत खरे ठरले! ‘प्रकाश आंबेडकर’ भाजपाला पोषक राजकारण करत आहेत?

सोलापूर मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सामना भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याशी होता. ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे निवडणुकीपूर्वी घोषित करणाऱ्या सुशीलकुमार शिंदेंचा सपशेल पराभव झाला आहे. निवडणुकीच्या सुरुवातीला सुशीलकुमार शिंदे हेच सोलापूरमधून विजयाचे दावेदार असतील अशी चर्चा होती. मात्र भाजपतर्फे धार्मिक कार्ड खेळत विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करून लिंगायत धर्मगुरू असलेल्या डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली.

ही बातमी पण वाचा : पराभव होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं – राजू शेट्टी

त्यातच प्रकाश आंबेडकरांनी सोलापुरातूनही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकांच्या घोषणेपासूनच शिंदेच्या डोकेदुखीत वाढ झाली होती. यंदाची निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असेल असे म्हणत भावनिक आवाहन केले मात्र भावनिक आवाहनाला साथ न देता सोलापूरच्या जनतेने डॉ. जयसिद्धेश्वर यांनाच साथ दिल्याचे दिसून आले आहे.

सुशीलकुमार शिंदेंना वंचितचा फटका? यंदाच्या निवडणुकीत सोलापुरात वंचित फॅक्टरची भर पडली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच सोलापूर मतदार संघातून उमेदवारी भरली. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणीत आणखी वाढ होणार अशी शक्यता होती. ही शक्यता बऱ्यापैकी खरी ठरली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी १,७०,००७ मते घेत शिंदे यांच्या पराभवास कारणीभूत ठरले.

ही बातमी पण वाचा : जिंकले एक आणि पाडल्या आठ जागा; वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला दणका

सोलापूर मतदारसंघाची आकडेवारी

  • भाजप : जय सिध्देश्वर महास्वामी – ५२६९८५
  • कॉंग्रेस : सुशीलकुमार शिंदे – ३६६३७७
  • वंचित : प्रकाश आंबेडकर – १७०००७