धनगर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

सोलापूर : सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा धडकला. यासाठी सोलापूर शहर जय मल्हारच्या आवाजाणे दुमदुमले आहे़ . यात राजकीय इतर क्षेत्रातील नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

दरम्यान, सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर यांच्या नामांतरासाठी धनगर समाज एकवटला आहे़ जिल्ह्यात संयोजकांनी तालुकानिहाय बैठका घेवून मोर्चात सामील होण्याचे आवाहन केले होते़ त्यानुसार जिल्ह्यातील विविध भागातून सोलापूर शहरात धनगर समाज बांधव दाखल झाले आहे. पुना नाका चौकातील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास गोल प्रदक्षिणा घालूनच मोर्चेकरी शहरात दाखल होत आहेत़ मोहोळ, बार्शी,करमाळा, माढा, पंढरपूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, सांगोला, माळशिरस आदी तालुक्यातील लोक मोर्चासाठी सोलापूर शहरातील पार्क चौकात एकत्र जमू लागला आहे़ . कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे़ वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी मोर्चा मार्गावरील काही मार्ग बंद करण्यात आले असून त्यासाठी वाहतूक शाखेने पर्यायी व्यवस्था निर्माण केली आहे़ शहरात सगळीकडे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा : धनगर आरक्षण के लिए मुझे मंत्री नहीं बनाया : महादेव जानकर

ही बातमी पण वाचा : आरक्षण की मांग पर धनगर समाज का मोर्चा

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले रक्ताने केलेल्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन