सोलापुरात एसटी-जीपचा अपघात, पाच ठार

सोलापूर : सोलापूर-वैराग मार्गावर आज शुक्रवारी भीषण अपघात झाला. जीप आणि एसटी बस यांची धडक झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. जीपमधील सहा प्रवासी गंभीर जखमी असून, एसटीमधील १४ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

सकाळी ९च्या सुमारास ही दुर्घटना घडली. एसटी बस ही सोलापूरहून बार्शीकडे जात होती.

भाजपाने औरंगाबादेत जाळला वारिस पठाण यांचा पुतळा

या अपघातात जीपचा चुराडा झाला. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना इस्पितळात दाखल केले आहे. सर्व मृतांमध्ये बार्शी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.