नांदेड : संस्कार करणे आजच्या काळाची गरज- बालाजी वाकोडे पाटील

Balaji Vakode Patil

नांदेड/प्रतिनिधी: संस्कार करण्याचे हे काम संस्कार भारती करतेय हे पाहून मन आनंदी झाले यातून समाजाने चांगले घेऊन आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत तरच चांगली पिढी उदयास येईल असे प्रतिपादन ज्ञान भारतीचे अध्यक्ष बालाजी वाकोडे पाटील यांनी केले.

संस्कार भारती तर्फे भरतमुनी जयंतीनिमित्त एकपात्री अभिनय स्पर्धा,पद्मश्री हरिभाऊ वाकणकर जन्मशताब्दी निमित्त चित्रकला स्पर्धा व चित्रप्रदर्शनी महात्मा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती तेव्हा ज्ञान भारती चे अध्यक्ष बालाजी वाकोडे पाटील हे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कार भारतीचे प्रांत कार्याध्यक्ष भगवानराव देशमुख,प्रमुख पाहुणे ज्ञान भारती मंडळाचे अध्यक्ष बालाजी वाकोडे पाटील ,तसेच एकपात्री स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिद्ध नाट्य कलावन्त किशोर पुराणिक (परभणी) व दिनेश कवडे हे नाट्यकर्मी उपस्थित होते.

किशोर पुराणिक स्पर्धकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले,मी स्पर्धकांचे सुंदर कलागुण पाहून प्रभावित झालो असून परिक्षकांचीच परीक्षा आहे ,नांदेड समितीचे काम कौतुकास्पद आहे,याच प्रकारे परभणीत देखील काम वाढविण्याचा संकल्प आज करतो” असे उद्गार काढले.

या कार्यक्रमात संस्कार भारती च्या सदस्यांनी विभाग,राज्य व देश पातळीवर पुरस्कार प्राप्त केले त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये सौ. अनुराधा पत्की (यांना आचार्य पदवी प्रदान झाली), डॉ. प्रमोद देशपांडे( संगीत) , आशिष कहाळेकर( नृत्य) दीप्ती उबाळे( नृत्य) सौ स्वाती देशपांडे, ईशा देशपांडे( नाट्य), श्रुती देशपांडे (सतार), गुंजन शिरभाते( व्हायोलिन ) . रावसाहेब पवार, रत्नदीप हिंगोले(चित्रकला) यांचा सामावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अनुराधा पत्की,सौ राधिका वाळवेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन जयंत वाकोडकर यांनी केले. कार्यक्रमाला रसिक ,पालक ,संस्कारभारती चे प्रांत सदस्य संजय जोशी, सुरमणी धनंजय जोशी, अभय शृंगारपूरे नैपथ्यकार लक्ष्मण संगेवार, नितीन पांपटवार,विजया कोदंडे व सागर ओझा तसेच प्रतिष्ठित नाट्य चित्रकला रसिक व संस्कारभारती प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.