कोरोनाआधी देश धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवाद या दोन महामारीने ग्रस्त : हमिद अन्सारी

Hamid Ansari

नवी दिल्ली :- कोरोनाआधी (Corona) देश धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवाद या दोन महामारीने ग्रस्त आहे, असे वक्तव्य माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी केले. काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या ‘द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग’ या नव्या पुस्तकाच्या डिजिटल प्रकाशाच्या वेळी ते बोलत होते. कोविड अतिशय वाईट महामारी आहे. परंतु, याआधी आपला समाज धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवाद या दोन महामारीने ग्रस्त आहे, असे अन्सारी म्हणाले. तसेच धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवादापेक्षा देशभक्ती ही सकारात्मक संकल्पना आहे, असेही ते म्हणाले.

हमिद अन्सारी (Hamid Ansari) म्हणाले की, आज आपला देश कोरोनाव्हायरसच्या महामारीशिवाय आणखी दोन महामारींचा सामना करत आहे. कोरोनापेक्षा या महामारींचा धोका अधिक दिसत आहे. भारताला धार्मिक कट्टरता आणि प्रखर राष्ट्रवादाने ग्रासलं आहे. मात्र या दोघांच्या तुलनेत देशभक्ती अधिक सकारात्मक संकल्पना आहे. देशप्रेम हे सैन्य किंवा सांस्कृतिकदृष्ट्या जास्त संरक्षणात्मक आहे.”

आज देश अशा विचारधारेच्या धोक्यात दिसत आहे, जी ‘आम्ही आणि ते’ या काल्पनिक श्रेणीच्या आधारावर विभाजनाता प्रयत्न करते, असं अन्सारी म्हणाले. मोदी सरकारवर निशाणा साधताना हमिद अन्सारी म्हणाले की, चार वर्षांच्या अल्पकाळातच भारताने ‘उदार राष्ट्रवाद’वरुन ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’पर्यंतच्या अशा राजकीय संकल्पनेचा प्रवास केला आहे जी लोकांच्या मनात घर करुन बसली आहे, असेही अन्सारी म्हणाले.

ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडीकडून बैठकीचं निमंत्रण नसल्याने अमोल मिटकरी नाराज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER