सामाजिक कार्यकर्ता आत्मदहन प्रकरण : मुख्याधिकारीसह जणांवर खुनाचा गुन्हा

सामाजिक कार्यकर्ता आत्मदहन प्रकरण

कोल्हापूर : स्वच्छता ठेकेदाराने केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ काल सोमवारी इचलकरंजी नगरपालिकेच्या दारात आत्मदहन केलेले कार्यकर्ते नरेश मोरे (Naresh More) याच्या मृत्यूप्रकरणी सहा जणांवर आज पहाटे येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी काल मध्यरात्री पाचशेवर नातेवाइकांनी नगरपालिकेत भोरे यांचे पार्थिव ठेवून आंदोलन केले. कारवाई होत नाही, तोवर मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आज पहाटे नातेवाइकांनी पार्थिव नगरपालिकेकडून हलवले.

आत्मदहन प्रकरणी जबाबदार धरून इचलकरंजीचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाच्या कार्यासन अकराचे प्रमुख दीपक पाटील, आराध्या एंटरप्राइजेस या कंपनीचा ठेकेदार नगरपालिकेचे माजी सभापती मारुती पाथरवट, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक मिसाळ, ठेकेदार कर्मचारी अमर लाखे या सर्वांवर भादवि ३०६ प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही बातमी पण वाचा : नगरपालिकेत सामाजिक कार्यकर्त्यांने घेतले पेटवून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER