पर्यावरणाला साजेसा रंगोत्सव साजरा करा!

कोल्हापूर :-  पाण्याची नासाडी आणि रासायनिक रंग टाळून पर्यावरणाला साजेसा रंगोत्सव (Holi) साजरा करण्याचे आवाहन विविध सामाजिक संस्थांनी केले आहे. नैसर्गिक रंगांचा (Natural colors) वापर करण्याचा सल्लाही या संस्थांनी दिला आहे.

शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थीही पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अलीकडे पुढे येत आहेत. अनिष्ट प्रथा टाळून सण साजरे करण्यावर भर दिला जात आहे. रंगोत्सव साजरा करताना, आपल्या एक दिवसाच्या आनंदासाठी आपण हजारो लिटर पाणी वाया घालवीत असतो. त्यामुळे कोरड्या रंगांनी हा उत्सव साजरा केला तर पाण्याची मोठी बचत होऊ शकते, याकडे शहरातील निसर्गमित्र, ‘मदर नेचर’ या सामाजिक संस्थांनी लक्ष वेधले आहे.

अनेकदा रंगपंचमीमध्ये मुक्या प्राण्यांच्या अंगावर रंग टाकल्याने त्यांच्या त्वचेवर परिणाम होतो. पुढे त्याची लागण माणसांना होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे मुक्या प्राण्यांचीही काळजी घेण्याचे आवाहन ‘मदर नेचर’ या संस्थेने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button