सोशल मीडियाला दोन्ही बाजू : रोहित पवार

मुंबई :- ज्या दिवसांपासून विधानसभेत आम्ही देवेंद्र भुयार आणि देवेंद्र फडणवीस यांना पाहात आहोत त्या दिवसांपासून विधानसभेत शांततेत चर्चाच झाली नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहू काय घडते ते असेही ते म्हणाले. पवार एका वृत्तवाहिनीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. “देवेंद्र भुयार यांना मी भाऊ अशी हाक मारतो. ते संघटनेतून आलेले आमदार आहेत. त्यांना मी हक्काने भाऊ म्हणतो. अगदी त्याच हक्काने देवेंद्र फडणवीस यांनाही भाऊ अशी हाक मारु शकतो. त्यांनी भावासारखं फक्त ट्रीट केलं पाहिजे.” या रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून विचारले असता पवार यांनी उत्तर दिले.

नेत्रविकारांबाबत भावी पिढीला जागरुक करणे आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

सोशल मीडियासंदर्भात रोहित पवार म्हणाले, सोशल मीडियाला दोन बाजू असतात एक चांगली आणि दुसरी वाईट. एखादी गोष्ट कमी प्रमाणात केली असेल पण जास्त प्रमाणात दाखवायची असेल तर सोशल मीडियाचा वापर हा केला जातो. काही पोर्टल्सही आहेत जी खोट्या बातम्या, अफवा पसरवण्याचे काम करतात. सगळे पोर्टल्स असे करतात असे नाही मात्र काही पोर्टल्स या गोष्टीही करतात. ही सोशल मीडियाची नकारात्मक बाजू आहे असे मला वाटते असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. दुसरी वाईट बाजू असते.“सोशल मीडियाला सकारात्मक बाजूही आहे. एखाद्या साध्यातला साधा माणूस जरी चांगले काम करत असेल तर लोकांपर्यंत ते काम पोहचणे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून होते. ही सोशल मीडियाची सकारात्मक बाजू आहे. असेही रोहित पवार म्हणाले.