गावाकडील मुलीच्या साधेपणावर नेटकरी घायाळ; म्हणाले, मोठ्या अभिनेत्रींनाही मागे टाकणार

villager-girl

मुंबई : आता सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून प्रसिद्ध होणे खूपच सोपे झाले आहे. आपल्याकडे प्रतिभा असो वा नसो, आपण श्रीमंत असाल की गरीब, दररोज आपणास इंटरनेटवर व्हायरल पोस्ट्स बघायला मिळत आहेत. लोक सोशल मीडियावर रात्रभर लोकप्रिय होतात. यावेळी सध्या एका गावाकडील मुलीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या मुलीने आपल्या साधेपणाने सर्वांची मने जिंकली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या मुलीचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती साध्या कपड्यात स्टोव्हवर पोळ्या बनवताना दिसत आहे. मात्र, या मुलीने काहीही न करता लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचा साधेपणा, सौंदर्य आणि निरागसतेचे नेटकऱ्यांनी ही मुलगी अगदी मोठ्या अभिनेत्रीलादेखील स्पर्धा देऊ शकते, असे म्हटले आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिचे आणखी व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यात ती पोळ्या बनवताना किंवा भाजी कापताना दिसत आहे. व्हिडीओमधील बॅकग्राउंड बघितल्यास असे दिसते की ती एखाद्या गावातली आहे. आश्चर्यकारक गोष्ट अशी की जिथे आज लोक सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आपल्या कपड्यांवर आणि मेकअपसाठी इतका खर्च करतात, तिथे ही मुलगी कोणतेही ढोंग न करता लोकांच्या मनात बसली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button