सामाजिक प्रश्नावर अधिवेशनात दिवसभर चर्चा व्हावी उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांची भूमिका

Dr. Nitin Raut

येत्या अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान सामाजिक प्रश्नासंदर्भात एक दिवसाची चर्चा ठेवावी अशी मागणी नितीन राऊत यांनी केली आहे.आठवडाभरापूर्वी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा मा.श्रीमती सोनियाजी गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना एससी, एसटी या घटकांच्या सर्वांगिण विकास साधण्यासाठी काही सूचना देणारे पत्र पाठवलं होत. यामध्ये नोकऱ्या, बढत्यांचा अनुषेश भरुन काढणे, त्यांच्या विकासासाठी योजनांचे पाठबळ देणे यासंबंधीचं मार्गदर्शन त्यांनी केलं होत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सामाजिक न्यायाच्या विषयांवर चर्चा व्हायला पाहिजे, अशी भूमिका उर्जांमंत्री नितीन राऊत यांनी मांडली आहे.

राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी लढतो आहे, ओबीसी बांधव आपले आरक्षण टिकवण्यासाठी संघर्ष करतोय, तर एससी, एस*टी समाजाचा प्रलंबित पदोन्नतीसाठी लढा सुरु आहे. तर अल्पसंख्याक समाज शिक्षणामध्ये आरक्षणसाठी संघर्षरत आहे.

या सर्व घटकांच्या विषयावर एकदा चर्चा होऊन आमचा महाविकास आघाडीचा सोशल अजेंडा काय आहे, तो जगापुढे आला पाहीजे. हा यामागचा उद्देश असल्याचं डॉ. नितीन राऊत यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER