सोशल डिस्टंसिंग नवे आणि जुने !

Social distancing

जागतिक महामारीच्या संकटाने सगळ्या जगाला वेढले आहे .धावणारे जग थांबविण्याची ताकद यापूर्वी कशातच नव्हती. अचानक ते जनजीवन ठप्प झाले .त्याला मुळी पर्यायच नव्हता .यामुळे खूप नवीन गोष्टी शिकवल्या, त्यातलाच हा नवा शब्द” सोशल डिस्टंसिंग !”खरच फक्त आज कळलेला नवा शब्द आहे का ? मुळीच नाही. फार पूर्वीपासून आपण हे अनुभवत आहोत .तंत्रज्ञानाची जसजशी प्रगती होत गेली ,तसे आपण भरपूर अंतरावर असूनही परस्परांशी बोलू शकतो आणि दिसू शकतो. अगदी आपल्या घरात बसून पण !त्यामुळे आपल्यातले फिजिकल अंतर मात्र वाढत गेले. सोशल डिस्टंसिंग म्हणजे खरं तर रोग प्रसार होऊ नये म्हणून दोन व्यक्तींनी एकमेकांमध्ये ठरवून दिलेले सुरक्षित अंतर तीन फूट सहा फूट राखणे.

परंतु आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी आपण डिस्टसिंगचा अनुभव प्रत्येक क्षेत्रात घेतोच आहे. आणि पूर्वीपासूनच व्यक्ती व्यक्ती मधला भेदभाव आणि ठरवून अंतर राखण्याची अस्पृश्यतेची वाट आपण राखली होती. खरे बघता ग्लोबलयझेशनच् मध्ये सोशल डिस्टंसिंग अजिबात नव्हते. पण खरे बघता कुठलेच क्षेत्र सोशल डिस्टंसिंगने बाकी ठेवले नाही.

कमला हॅरिस या वांशिक आणि स्त्री पुरुष समानतेचे प्रतीक बनल्या आहेत. खरे बघता भारतीय अमेरिकन समुदायाच्या प्रतिनिधीची निवड व्हावी हे लक्षणीय आहे खरे!१८६० या दशकात की अमेरिकन अब्राहम लिंकन चे सरकारने गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्याचा निर्णय घेतला .तरीही आज तेथील कृष्णवर्णीयाबद्दलचा असंतोष वाढतच जाताना दिसतो .हे सोशल डिस्टंसिंग नव्हे काय?

या महामारीने जनमानसाला आंदण दिलेला शब्द वाटतं असला तरी कुठल्याच क्षेत्राला याचे वावगे नाही .सार्वजनिक आरोग्य क्षेत्र याला कसे अपवाद असेल? सरळ सरळ ८०% रुग्ण खाजगी रुग्णालयात तर २०% नाईलाजास्तव सरकारी रुग्णालयात असे चित्र दिसून येते .अन्न,वस्त्र निवारा याच्या खालोखाल शिक्षण व आरोग्य समजल्या जातात. परंतु अर्थसंकल्पात मिळालेली तुटपुंजी तरतूद आणि त्यामुळे साधी डागडुजीही नसलेले मर्यादित दवाखाने, उपचार सुविधांचा अभाव, मर्यादित औषध आणि चाचण्यांची कमतरता, डॉक्टरांच्या न भरलेल्या जागा हीच परिस्थिती सगळीकडे दिसते .कोणत्याही सरकारी रुग्णालयात बघितलं तर दिसणारे चित्र एकच ! गर्दी, केरकचरा, दुर्गंधी ,भांडणे आणि धक्काबुक्की ,रुग्णांचे व्हिवळणे ,मृत्यू पडलेल्या चे आप्त त्यांचे आक्रोश ,कमी पडल्याने जमिनीवरचे बेड इमर्जन्सी मध्ये येणाऱ्या त्याच्या पेशंटच्या नातेवाईकांची अफाट गर्दी हेच चित्र दिसते .

याउलट खासगी प्रॅक्टिस करणारे किंवा कुठल्याही माध्यमातून काम करणाऱ्या हॉस्पिटलचा रूम्स पहा किंवा 1983 पासून खाजगी खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी हॉस्पिटलची आरोग्य क्षेत्रातली वाटचाल बघा !त्यांचे स्वरूप एखाद्या पंचतारांकित हॉटेल प्रमाणे दिसते आणि आरोग्य विमा यासारख्या सोयी असल्याने गुंतवणूकदारांसाठी सुद्धा ती एक मोठी गुंतवणुकीची संधी ठरते .त्यात आरोग्य सेवांचे व्यापारीकरण आणि मेडिकल रॅकेट निर्माण होऊन, सामाजिक दरी वाढतच जाते.

या सामाजिक दरीला कुठलेही पवित्र क्षेत्र याला अपवाद नाही. मानववांशशात्रानुसार मानवी समाज प्रत्यक्षात यायला जवळ जवळ दीड लाख वर्ष गेली .काही संस्कृती अनेक वर्ष टिकल्या देखील .परंतु काहींना नैसर्गिक आपत्तीनी नष्ट केले तर काहींना मात्र माणसाने अंतर्गत यादवीतूनच .समज जीवनात प्रगती झाली .सत्त्येचा हव्यास अमर्याद वाढला ,आणि माणसा माणसा तील दरी संपत्तीच्या विषमतेतून वंश,जाती धर्म यातूनही वाढली .काय खरं,काय खोटं,न्याय की अन्याय हे सर्वसामान्यांना पडलेले प्रश्न .पण अश्या सगळ्यातून जगण्याची लय मिळते ती आपली मूल्य,चांगली जीवनशैली व तत्वज्ञान यातून! आपल्या जगण्याला अर्थ मिळतो तो सुरक्षिततेतून .आणि आधुनिकतेच्या जगन्नाथाचा हा रथ फक्त मूल्य विवेकाने सावरू शकतो .मग मूल्य विवेक जागवणारी क्षेत्रे म्हणजे आपली कुटुंब व्यवस्था व शिक्षण व्यवस्था त्याचे काय?

शिक्षण म्हणायचं कशाला? काय अपेक्षा आहे शिक्षणाकडून? रेणुताई दांडेकर म्हणतात,” शिकणं व शिक्षण यातला फरक म्हणजे जगणं आणि पुस्तकात कोंडणे यात जे अंतर आहे .तेच शिक्षण आज घेतलं जातं जे भौतिक चंगळवाद आणि आर्थिक सुबत्ता मिळवण्याची संधी देण्यासाठी म्हणून उपयोगी ठरते. मग अशा शाळा सेंट्रल बोर्ड, इंग्रजी माध्यमाच्या, शहरातल्या शाळा म्हणजे एखाद्या वस्तूवर एकावर एक घातलेले चकचकीत वेष्टण. त्यात मूल्य कुठे सापडणार ?म्हणूनच रानातून डोक्यावर मोळी आणि तोंडावर फडका बांधलेली एखादी मैत्रीण त्यांना म्हणते ,”परीक्षा ,शाळा, वर्ष वायाच जायचं काय घेऊन बसलात? देश बुडतोय. वर्ष नाही पडलं, माणूस माणसाच्या जवळ आलं घरात राहील! कामाला लागलं !ही किती मोठी गोष्ट कळली तिला !

तीच गोष्ट कुटुंबव्यवस्थेची ! पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव आणि जबरदस्त पगडा असलेल्या या पाश्चिमात्य आणि पौर्वात्य संस्कृतीतला माणसाविषयीचा फरक सांगताना संस्कृतिक मानसशास्त्रज्ञ सांगतात की पाश्चिमात्यांच्या केंद्रस्थानी व्यक्ती आहे .व्यक्तीच्या भावना, यांचा अविष्कार हा त्यांच्या स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क! माणूस संपूर्ण व स्वयंपूर्ण भाग असून त्याच्या उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी त्याला समाजातील इतर घटकांशी स्पर्धा करण्यावर समाजाचा आक्षेप नसतो. इतरांचे ही हक्क मान्य करणे पण आपल्या इच्छेचा बळी न देता हा या संस्कृतीचा स्वभावविशेष !

पौरात्य संस्कृतीमध्ये माणूस हा समाजव्यवस्थेचा एक पूरक घटक आहे. संस्कृती केंद्रस्थानी माणुसकीच्या नियमांनी बांधलेला! यात सीमित स्वातंत्र्य आणि समष्टीला महत्त्व. पाश्चिमात्य संस्कृतीने पहिला बळी घेतला गेला तो आपल्या कडच्या नातेसंबंधांचा. दूरदेशी ,गावी गेलेल्या पिढीमुळे भौगोलिक निकटता संपली .दृष्टी पासून जो दूर तो मनातून दूर! मानवी संबंधांमध्ये स्पर्शाला खूप महत्त्व असल्याचे 1930 मध्ये “हारलो “या शास्त्रज्ञाने सिद्ध केले ,माणसाच्या वाढीसाठी शारीरिक आणि मानसिक स्पर्श खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळेच मनोकायिक आजार आणि वृद्धांच्या कपाळी एकाकीपणा आला. नात्यांची वीण उसकटण्याची क्रिया सुरू झाली होती, ती कोरोनाने तीव्र केली.पण जी स्पेस,ही हॉटेलिंग, परदेश वाऱ्या,इतर भौतिक सुखाचे कार्येक्रम यांनी व्यापली होती ती वाट आज बंद होऊन मृत्युच्या भीतीने का होईना, सगळे आप्त एका पातळीवर येऊन परस्पर संपर्क साधू लागले. ख्यालीखुशाली विचारू लागले. जुन्या मित्रांच फोन्स मिळवू लागले. हे एवढं जरी साध्य झालं तरी कुठे तरी आशेचा किरण जाणवतो .मात्र पाळमुळ खोल आहेत .प्रक्रिया सुरू झाली तरी कमावले म्हणायचे !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER