…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे टीकास्त्र

Maharashtra Today

मुंबई : मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने(SC) रद्द केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या रंगल्या आहेत .

सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर मराठा आरक्षणावरून टीका करत आहेत. त्यातच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकार हे ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवत असल्याची खोचक टीका केली होती. त्यामध्ये त्यांनी सर्वच जर केंद्राने करायचं असेल तर मग राज्याने काय माशा मारायच्या का? असा प्रश्न देखील उपस्थित केला होता. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी फडणवीस यांना उत्तर देताना माशा मारण्याशिवाय तुमच्याकडे कामच काय उरलं आहे? असा टोला लगावला होता. यावरून आता माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार राम सातपुते(Ram Satpute) यांनी उडी घेतली असून त्यांनी नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे .

आमदार राम सातपुते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , आम्ही समजू शकतो मलिकजी आपण मंत्री असताना आपला जावई ड्रग केसमध्ये तुरुंगात आहे, आपण रोज घरी गेलात की बायका पोरं भांडत असतील आणि म्हणत असतील जावयाला बाहेर काढू शकत नाही, असो.. आपली अवस्था मी समजू शकतो. मला तर वाटते आपण मनोरूग्ण झाला आहात, सांभाळा स्वतःला , अशा शब्दात नवाब मलिक यांच्यावर निशाण साधला .

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button