… तर तेजस्वी यादव पवारांचा तो विक्रम मोडीत काढणार ?

Sharad Pawar - Tejashwi Yadav

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections) निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि १५ वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या नीतीश कुमार (Nitish Kumar) यांच्या विरोधात राजदचे युवा नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी महाआघाडीच्या प्रचाराची धुरा सांभाळली. तेजस्वी यादव यांच्या झंझावाती प्रचारामुळे महाआघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. विविध संस्थांच्या एक्झिट पोल्समध्ये आरजेडी आणि काँग्रेस (Congress) महाआघाडीला सत्ता मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाआघाडीची सत्ता आली तर तेजस्वी यादव बिहारचे आणि भारतातील एखाद्या राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव ३८ व्या वर्षी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते.

विविध संस्थांचे एक्झिट पोल्स जर खरे ठरले तर तेजस्वी यादव मुरब्बी राजकारणाची झलक दाखवण्याबरोबरच अनेक नेत्यांचे रेकॉर्ड मोडीत काढतील.

प्रफुल्लकुमार महंतो ३४ व्या वर्षी आसामचे मुख्यमंत्री झाले होते. नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला ३८ व्या वर्षी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री झाले होते.

तर, बिहारच्या मुख्यमंत्रिपदी सर्वांत तरुण विराजमान होण्याचा विक्रम सतीश प्रसाद सिंह यांच्या नावावर आहे. सतीश प्रसाद सिंह जानेवारी १९६८ मध्ये ३२ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते. डॉ.जगन्नाथ मिश्रा एप्रिल १९७५ मध्ये ३८ व्या वर्षी बिहारचे मुख्यमंत्री झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER