मग कोरोना लसीचे बारामतीच्या लॅबमधून वितरण करणार का? चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला

Chandrakant Patil-Supriya Sule

मुंबई : कोरोना व्हायरसवर (Corona Vaccine) लस कधी येणार याची सर्व आतुरतेने वाट पाहात आहेत . तर दुसरीकडे कोरोनाच्या लसीवरून राजकारण चांगलेच पेटले आहे .

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये (serum Institute, Pune) तयार झालेल्या लसीचे आता बारामतीच्या लॅबमधून वितरण होणार आहे का? असा सवाल उपस्थित करत भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांना टोला लगावला. पुण्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील आले होते.

यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर  टीकास्त्र सोडले .पुणेकरांनी शोधलेल्या कोरोना लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नयेच, असे  वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले होते. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘त्यांचे विधान हे फारच हास्यास्पद आहे.

मला कधी कधी असं वाटतं की, आपण कोणत्या समाजात राहतोय. पुणेकरांनी लसीचा शोध लावला आहे, याला कोण नाकारत आहे? पण त्याला मॉनिटर कोण करत आहे, त्याला फायनान्स कोण करत आहे, त्याचा आढावा घेण्यासाठी कोण आले आहे, याचाही विचार करावा, म्हणजे मग बारामतीला लस निघाली असती तर प्रत्येक श्रेय तिकडेच गेले असते. त्याचप्रमाणे कोरोनाच्या लसीवर पंतप्रधान मोदी हे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होते. लसीचे नियोजन हे केंद्र सरकार करणार आहे की सुप्रिया सुळे करणार आहे का बारामतीतील लॅबमध्ये चालणार आहे?’ असा टोलाही पाटील यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER