… तर रक्तरंजीत लढाईला आम्ही तयार ; शिवसेना आमदाराचा इशारा

उजनीचा पाणी प्रश्नावरून वादंग!

Sharad Pawar - Shahajibapu Patil - Maharashtra Today

मुंबई : उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी सांडपाण्याच्या नावावर इंदापूर तालुक्यात वळवण्यास मान्यता मिळालेली आहे. उजनी धरणातील शंभर टक्के पाणी वाटप झाले आहे. तरीही पाच टीएमसी पाणी सांडपाण्याच्या नावाखाली वळवल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे . यावरून सांगोल्याचे शिवसेना (Shivsena) आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या चीक महुद येथील निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगी नाद आंदोलन केले. यावेळी र शहाजीबापू पाटील यांनी उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्यास तीव्र विरोध केलेला आहे. अशा पद्धतीचा निर्णय झाला तर रक्तरंजित लढाईला तयार राहावे असा इशारा देत त्यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे .

राज्यात ज्या ज्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या विचाराचे सरकार आले तेव्हा तेव्हा त्यांनी फक्त बारामती हाच विकास केलेला आहे. राज्यातला सगळा निधी बारामतीला न्यायचा आणि बारामती हे विकासाचं मॉडेल आहे. हे देशभर सांगायचं ही पवारांची पद्धत आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, सुधाकरराव नाईक या नेत्यांनी नेहमी राज्याचा विकास पाहिला मात्र पवारांनी फक्त बारामतीचा विकास केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button