…तर आम्ही रश्मी शुक्ला यांच्यासोबत, प्रणिती शिंदेंचे विधान

Maharashtra Today

सोलापूर : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अत्यंत संवेदनशील झाल्याचं चित्र आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी फोन टॅप केल्याचं प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत विचारले असता त्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर होणारे आरोप जर खोटे असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मात्र या प्रकरणाची कारवाई अद्याप सुरू आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर यावर भाष्य करू, अशी प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे. प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

प्रणिती शिंदे यांनी यावेळी बोलताना युपीएच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादावर देखील भाष्य केलं आहे. राऊतांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. महाविकास आघाडी एकत्र येण्यामध्ये देखील पवार साहेबांचे योगदान मोठे आहे. मात्र सोनिया गांधी या यूपीएच्या चेअरमन आहेत आणि त्याच आमच्या नेत्या आहेत अशी प्रतिक्रिया प्रणिती शिंदे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER