म्हणून अनुष्काला फोन करून रडला होता विराट कोहली

Virat Kohli - Anushka Sharma

2013 मध्ये एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या वेळी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहलीची (Virat Kohli) सर्वप्रथम भेट झाली होती. त्या भेटीनंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि चार वर्षानंतर म्हणजे 11 डिसेंबर 2017 ला या दोघांनी इटलीत लग्न केले. त्यानंतर मुंबईतील मित्रांसाठी भव्य असे रिसेप्शनही ठेवले होते. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात हे त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोतूनही दिसून येते. आता लवकरच दोघे आई-बाबाही होणार आहेत.

मात्र क्रिकेटच्या मैदानावर अत्यंत आक्रमक असणारा विराट कोहली खूपच संवेदनशीलही आहे. एका मुलाखतीत विराटने सांगितले होते की, एकदा मी अनुष्काला फोन केला आणि प्रचंड रडायला लागलो होतो. रडण्याचे कारण विचारचा विराट म्हणाला, 2017 मध्ये भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन म्हणून माझ्या नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती मला फोनवरून देण्यात आली होती. त्यानंतर मी लगेचच अनुष्काला फोन केला. अनुष्काशी बोलताना मला माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण होऊ लागली. मी कधीच विचार केला नव्हता की, मी कधी तरी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन बनेन. परंतु मला ती संधी मिळाली. हे सांगताना माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आलेले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER