म्हणून उर्मिलाला विमानतळावर अडवले

Maharashtra Today

‘रंगीला’ सिनेमामुळे उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) संपूर्ण देशभरात प्रचंड लोकप्रिय झाली होती. आजही उर्मिलाचे नाव घेतले की लगेचच तिचा रामगोपाल वर्माचा (Ramgopal Varma) ‘रंगीला’ आठवतो. त्याचसोबत राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांच्या ‘चायना गेट’ सिनेमातील ‘छम्मा छम्मा’ हे गाणेही आठवते. या सिनेमांना काही वर्षे झाली असला तरी ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. उर्मिलाने सिनेमात काम करणे बंद केले असले तरी काँग्रेसकडून (Congress) ती लोकसभा निवडणुकीला उभी होती. आणि घरोघरी जाऊन प्रचारही केला होता. आता काही महिन्यांपूर्वी तिने ज्या शिवसेनेला ती कट्टरवादी पक्ष म्हणत असे त्याच शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करून सगळ्यांनाच चकित केले होते. असे असताना उर्मिलाला कोणी ओळखत नसेल असे वाटत नाही. पण मुंबईच्या विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी तिला ओळखले नाही आणि तिचा चेहरा पाहिल्यानंतच तिला विमानतळाच्या आत सोडले. हे वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटले असेलच. पण हे खरे आहे.

उर्मिलाने १९८० मध्ये ‘कलयुग’ सिनेमातून बाल कलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर १९९१ मध्ये उर्मिला सर्वप्रथम ‘नरसिम्हा’ सिनेमात नायिका म्हणून दिसली होती. यात तिचा नायक होता रवी बहल. यानंतर उर्मिलाने ‘रंगीला’, ‘जुदाई’, ‘सत्या’, ‘कौन’ असे अनेक सिनेमे केले होते. २०१६ मध्ये उर्मिलाने तिच्यापेक्षा ९ वर्ष लहान असलेल्या काश्मीरी व्यावसायिक मोहसीन अख्तर मीरसोबत लग्न केले. उर्मिलाला सगळे ओळखत असतानाही उर्मिलावर असा प्रसंग उद्भवला होता. उर्मिला शुक्रवारी मुंबईच्या विमानतळावर आली होती. यावेळी तिला विमानतळाच्या मेन गेटवरच सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फोर्स (CISF) च्या अधिकाऱ्यांनी तिला अडवले होते. मात्र याचे कारण होते. उर्मिलाकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नसणे. विमानतळावर सध्या ओळखपत्र पाहिल्याशिवाय सोडले जात नाही. त्यामुळे उर्मिलाकडे ओळखपत्र नसल्याने तिला आत सोडण्यास अधिकाऱ्यांनी मज्जाव केला. विशेष म्हणजे उर्मिलाने शिवसेनेची पदाधिकारी असतानाही कोणताही बडेजावपणा केला नाही आणि घरातून ओळखपत्र मागवले. ओळखपत्र येईपर्यंत ती तेथेच टाईम पास करीत उभी राहिली होती. काही वेळानंतर तिचे ओळखपत्र आले. पुन्हा मेन गेटवर जाऊन उर्मिलाने ओळखपत्र दाखवले. पण ओळखपत्र पाहून सुरक्षा अधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही, त्यामुळे त्यांनी तिला मास्क काढून चेहरा दाखवण्यास सांगितले. उर्मिलानेही मास्क काढून चेहरा दाखवला. त्यानंतरच उर्मिलाला विमानतळाच्या आत सोडण्यात आले.

उर्मिलाच्या या वागण्यापासून तथाकथित नेत्यांनी धडा घ्यावा एवढेच या निमित्ताने म्हणावेसे वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER