… तर उद्याचा सूर्य राष्ट्रवादीचा असेल, जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

jayant Patil.jpg

राजुरा : संघर्ष करा. संघर्षाशिवाय गत्यंतर नाही. या संघर्षातून तुम्ही मार्ग काढला, तर उद्याचा सूर्य राष्ट्रवादीचा असेल, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी चंद्रपूर जिल्यातील राजुरा येथे ‘राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमा’त केले.

चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा फारसा प्रसार नाही. या संदर्भात पाटील म्हणालेत, अनेक जण पक्ष सोडून गेले मात्र आजही राष्ट्रवादी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता राजुऱ्यात पक्षासाठी काम करतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष आहे. पण आपण पक्ष वाढविण्यासाठी आता कंबर कसली पाहिजे. अनेक जण पक्षात येण्यास इच्छुक असतात. अशा लोकांना पक्षात येण्यास प्रोत्साहित करा, पक्षाची बूथ कमिटी मजबूत करा आणि संपर्क वाढवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER