‘हे आहे केजरीवाल सरकारने ठाकरे सरकारचे उचललेले महाराष्ट्र मॉडेल’, भाजपचा निशाणा

Maharashtra Today

मुंबई : ‘मोदीजी आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली?’ असे विवादित पोस्टर लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी काही रिक्षा चालक आणि मजुरांना ताब्यात घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी पोस्टर्स लावले होते. अटक केलेल्या काही जणांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, ते राजकीय पोस्टर्स होते हे त्यांनाही माहिती नव्हते. 11 मे रोजी आम आदमी पक्षाचे नगरसेवक धीरेंद्र कुमार यांच्या कार्यालयात त्यांना पोस्टर्स लावण्यासाठी देण्यात आले होते. या रिक्षा चालकांना आणि मजुरांना पोस्टर लावण्याचा मोबदलाही देण्यात आलेला नाही. आणि हाच धागा पकडून भाजपचे आमदार अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी पुन्हा ‘ठाकरे’ सरकारला(Thackeray govt) डिवचले आहे.

‘आप सरकारचा कारनामा, मोदींविरोधी पोस्टर लावण्यासाठी रिक्षावाल्याना कामाला लावले. काम झाल्यावर त्यांनाही चुना लावला, त्यांचेही पैसे बुडवले. हे आहे केजरीवाल यांनी उचललेले ठाकरे सरकारचे ‘महाराष्ट्र मॉडेल. (‘Maharashtra model)यंत्रणा फक्त भाजपा आणि मोदींविरोधासाठी वापरायची, कोरोनाशी झुंज दुय्यम’, असे म्हणत भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा सोडला आहे. .

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button