म्हणून या नायिकेला चित्रपटात पुन्हा जीवंत दाखवावे लागले

AAN

पूर्वीच्या काळी निर्माते-दिग्दर्शक वितरकांचे म्हणणे ऐकायचे. याचे कारण म्हणजे एकतर वितरक अगोदर पैसे द्यायचे आणि त्यांना प्रेक्षकांची नस ठाऊक असायची. त्यामुळे अनेक असे चित्रपट आहेत ज्यात वितरकांनी हस्तक्षेप करून काही बदल घडवले आणि ते चित्रपट सुपरहिट झाले. कोणत्या कलाकाराची प्रेक्षकांमध्ये काय इमेज आहे आणि त्यांना त्या कलाकाराला पडद्यावर कसे बघायला आवडते याची इत्यंभूत माहिती वितरकांकडे असायची. त्यामुळेच निर्माते वितरकांचे ऐकायचे. वितरकांमुळेच प्रख्यात दिग्दर्शक महबूब खान (Mehboob Khan) यांनाही चित्रपटात मरण पावलेल्या नायिकेला पुन्हा जीवंत दाखवण्याची कसरत करावी लागली होती. हा चित्रपट होता आन (AAn) आणि नायिका होती निम्मी (Nimmi).

Aan (1952) | Superhit Action Movie | आन | Dilip Kumar, Nimmi - YouTubeआन हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला पूर्ण लांबीचा बिग बजेट रंगीत चित्रपट होता. चित्रपटाच्या कथेनुसार निम्मीचा अगोदरच मृत्यू होता. जेव्हा वितरकांनी चित्रपट पाहिला तेव्हा त्यांनी चित्रपट घेण्यास नकार दिला. मेहबूब खान यांना वितरकांनी सांगितले की, निम्मीला अगोदरच मारल्यामुळे प्रेक्षक पुढील चित्रपट पाहणार नाही आणि त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर होईल. निम्मी प्रेक्षकांची अत्यंत आवडती नायिका असून तिने स्वतःचे स्थान निर्माण केलेले आहे. खरे तर तोपर्यंत निम्मीने सह नायिका म्हणूनच काम केले होेते परंतु ती प्रेक्षकांच्या मनात बसली होती.

त्यामुळे निम्मीचा मृत्यू शेवटी दाखवा असे वितरकांनी मेहबूब खान यांना सांगितले. वितरकांचे म्हणणे ऐकून चित्रपट पूर्ण झाला असतानाही मेहबूब खान यांनी कथानकात बदल न करता निम्मीवर एक ड्रीम सिक्वेंस तयार केला आणि तो चित्रपटात जोडला. त्यामुळे कथेतील मृत्यूनंतरही निम्मीचे पुन्हा दर्शन प्रेक्षकांना झाले आणि चित्रपटही बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. विशेष म्हणजे या चित्रपटाचा लंडनमध्ये प्रीमियर करण्यात आला होता. कलाकारांची अशीही जादू असते.

ही बातमी पण वाचा : पतीच्या निधनानंतर एकटी पडली करीना कपूरची ही मावशी, अशा प्रकारे जगली पुढचं आयुष्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER