…तर यापेक्षा मोठा महाराष्ट्रद्रोह होऊच शकत नाही : रुपाली चाकणकर

Rupali Chakankar

मुंबई : परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचे संसदेत चांगलीच चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खासदार नवनित राणा (Navneet Rana) यांनी आरोप केला. तसेच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी दहा, धमकावले गेल्याचा पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. या आरोपांवर सावंत यांनी उत्तर देत शिवसेनेचा उलगडा केला.

यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नवनित राणा यांच्या समर्थनार्थ भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उडी घेतली. त्यांनी ट्विट करत नवनित राणा याना पाठिंबा दिला, तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ आणि नवनित राणा यांना सल्ला दिला.

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या नावाचा वापर करून तुम्ही ज्यांना पाठीशी घालत आहात त्यांना एकच प्रश्न विचारा चित्रा वाघ की आज तुम्ही गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या हक्काचा GST निधी मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले. महाराष्ट्रात राहुन शासनाधिकृत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता अनधिकृत अशा PM Care Fund ला मदत केली जे आज हिशोब मागितला तरी द्यायला तयार नाहीत, यापेक्षा मोठा महाराष्ट्रद्रोह होऊच शकत नाही.”

त्या पुढे म्हणाल्या की, “नवनितजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल, तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा, कारण आज तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे, ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे, म्हणून मांडता आली.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER