म्हणून कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा धोकादायक आहे!

Corona Second Wave - Maharastra Today
Corona Second Wave - Maharastra Today

देशात पाच विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या. शाळा आणि महाविद्यालयं परिक्षेची तयारी करत आहेत. दळण वळणाची साधन सुरळीत सुरु होत होती. रस्त्यांवर बाजारांमध्ये पहिल्यासारखी रोनक आली होती. ही सर्व लक्षण सांगत होती. कोरोनाच्या साथीवर आपण विजय मिळवला; पण गेल्या आठवड्यात चित्र पालटंल. कोरोना परतला आणि सोबतच लॉकडाऊन देखील. लोक हवालदिल आहेत. आरोग्य आणि आर्थिक संकटांना एकाच वेळी तोंड देत आहेत.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात शुक्रवारी कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. एकाच दिवसात ६२ हजार कोरोना रुग्णांची देशभरात नोंद झाली. सोमवारपर्यंत हा आकडा वाढून ६८ हजारांवर गेला. याआधी ऑक्टोबर २०२० मध्ये एकाच दिवशी सर्वाधिक २० हजार रुग्णांची नोंद झाली होती. दुसऱ्या लाटीच्या संक्रमणानंतर १५ ते १६ मार्चपर्यंत कोरोना संक्रमणाचा आकडा सर्वाधिक ३० हजारांचा होता. नंतर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली. २२ मार्च ते २८ मार्चपर्यंतच्या सात दिवसांमध्ये एकूण ३.९० लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशात कोव्हीड – १९ ची दुसरी लाट तुलनेत वेगानं पसरत आहे. हा वेग किती तिव्र आहे हे समजण्यासाठी तुम्हाला आकडेवारीकडं लक्ष द्यावं लागले. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये कोरोना शिखरावर होता. म्हणजे चार महिन्यात तीन लाख आकडे कोरोनानं सुरुवातीच्या काळात गाठले होते तर सप्टेंबर- ऑक्टोबरच्या दरमन्यान सहा लाख रुग्णांना २६ दिवसात कोरोनाची बाधा झाली होती. फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली असं मानलं तर १७ दिवसात तीन लाख कोरोनाग्रस्त रुग्ण नोंदवण्यात आलेत. यानंतर देशात सात लाख कोरोनाग्रस्तांचा आकडा गाठायला कोरोनानं फक्त २५ दिवसांचा वेळ घेतला.

काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट प्रचंड तीव्र आहे. यात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. गेल्या सात दिवसात कोरोनाग्रस्तांची सरासरी काढली तर महाराष्ट्रात कोरोनाचा किती कहर आहे हे स्पष्ट होतं. महाराष्ट्रात मागच्या तुलनेत कोरोना दहापटीनं वाढतोय. राज्यात सध्या असणाऱ्या अॅक्टीव्ह केसेसचा आकडा कोरोनानं ११७ दिवसात गाठला होता. यावरुन कोरोनाची महाराष्ट्रातली भिषण परिस्थीती ध्यानात येते.

दुसऱ्या लाटेचं कारण

कोणताची साथीचा रोग असो त्याच्या संक्रमण काळात अशी परिस्थीती निर्माण होतेच की संसर्गाचा वेग घटता घटता अचानक वाढतो. साधारणपणे दुसऱ्या लाटेत त्या वयोगटातल्या लोकांना विषाणूची लागण जास्त होते जे पहिल्या लाटेत सुरक्षित असल्याचं वाटत होतं. एखाद्या महामारीच्यावेळी असे अनेक टप्पे येतात. नेहमी दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत विषाणूचा प्रादुर्भाव आधीच्या तुलनेत जास्तीचा असतो आणि परिस्थीती भयानक बनलेली असते.

महामारीचा इतिहास बघितला तर मागच्या शतकातील १९१८ – २० मध्ये सर्वाधिक नुकसान स्पॅनिश फ्लूमुळं झालं होतं. या महामारीचे तीन टप्पे होते. स्पॅनिश फ्लूच्या सुरुवातीबद्दल स्पष्ट माहिती नाहीये. १९१८ ला पश्चिम युरोपात पहिलं महायुद्ध निर्णायक वळणावर असताना पहिली संक्रमणाची लाट आली होती. तरी त्यामुळं जास्तीची जिवीत हानी झालेली नाही. दुसऱ्या लाटीत निमोनियाचे लक्षण दिसून आले दोन ते तीन दिवसातच संक्रमित व्यक्तीचा मृत्यू व्हायचा. इतकी तीव्र ही प्लेगची दुसरी लाट होती. २० के ४० वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या लाटीचा तडाखा बसला होता.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकाचं कारण म्हणजे जनता आणि सरकार दोघांना कोरोनाचं नसलेलं गांभीर्य असल्याचं तज्ञ लोक सांगत आहेत. ‘पब्लिक हेल्थ फाउंडेशनचे ऑफ इंडीयाचे प्रमुख आणि हार्वर्ड विद्यापीठाचे अतिथी प्राध्यापक साईनाथ रेड्डी’ यांनी हे विधान केलंय. अर्थव्यवस्थेला फटका बसेल म्हणून बाजारपेठा सुरु केल्याचं एक कारण सांगण्यात येतंय. कोरोनाचा नवा विषाणू भारतासमोरील कोरोना प्रसाराचं सर्वात मोठं आवाहन आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटीतून वाचण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, मास्क वापर, हात धुणे सारखे उपायचं दुसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी महत्त्वाचे आहेत. शिवाय कोरोनाचा लढा दुसऱ्या लसीमुळं अधिक सोप्पा झालाय. कोरोनाच्या कितीही नवीन अवृत्ती आल्यातरी त्याचा मुकाबला करण्यासाठीच्या लशी अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात येतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button