म्हणून आधुनिक जगाचा पाया रचण्याचं खरं श्रेय भारताला जातं!

radio - Maharashtra Today

भारताची आजची प्रतिमा विकसनशील देश अशी आहे. युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत भारत सध्याला मागं पडल्याचं चित्रं आहे. औद्यागिक क्रांतीनंतर युरोपाची आणि दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेची भरभराट झाली. जगाच्या वेगात भारत धावू शकला नसल्यामुळं मागं पडला आणि हेच भारताच्या मागासल्यापणाचं कारण असल्याचं बोललं जातं परंतू हे पुर्ण पणे खरं नाही. ज्यावेळी जगभरात साथीच्या रोगांना बळी पडून माणसं किड्या मुंग्यांसारखी मरायची तेव्हा भारतात त्यावर औषधं आणि उपाय शोधून काढली होती. रोगावर औषध घेतलं तर रोग बरा होऊ शकतो इतकीही समज जेव्हा जगभरातल्या प्रमुख राष्ट्रांना नव्हती तेव्हा भारतात शस्त्रक्रिया करण्याइतपत आरोग्य विज्ञान पुढारलेलं होतं. फक्त रोग आणि औषधंच नाहीत तर स्थापत्य शास्त्र, नृत्य, कला, युद्धनिती, शस्त्रे यात भारत पुढारलेला होता. त्यावेळच्या पुढारलेल्या भारतानं जगाला दिलेल्या या देणग्यांमुळं अधुनिक जगाचा पाया रचनं शक्य झालं.

वायरलेस क्रांतीचे जनक

रेडीओचा शोध कुणी लावला हा प्रश्न विचारलातर गुलइलमो मार्कोनी हे नाव आपण घेतो पण हे खरं नाही रेडीओचा शोध खऱ्या अर्थान लावलाय एका भारतीयानं, ऐकून धक्का बसेल पण हे खरं आहे. जगदीश चंद्र बोस यांनी रेडीओचा शोध लावला. त्यांनी मीलीमीटर रेंज रेडीओ तरंग मायक्रोव्हेवचा वापर सुरुंग लावण्यासाठी आणि आलार्म वाजवण्यासाठी केला. त्यांच्या या संशोधनांनतर पुढं लोहा- पारा- लोह कोहिरर टेलिफोन डिटेक्टरच्या स्वरुपात उदयास आला. पुढं रेडीओ प्रसारणाच्या वायरलेस क्रांतीची मुहुर्तमेढ रेडीओमुळं झालं. पुढं १९७८ मध्ये भौतिमशास्त्राचे नोबेल विजेते सर नेविल मोट यांनी साठ वर्षांच्या पुढं विचार करत होते असं म्हणलं. या शोधानं वायरलेस क्रांती झाली

आज आपण वापरत असेलेल स्मार्टफोन, इमेल किंवा फॅक्स असोत सर्वच गोष्टी वायरलेस आहेत. गोष्टी वायरलेस झाल्यामुळं जग जवळ आलं. या सर्व तार विरहीत क्रांतीची तार रेडीओशी जोडली जाते ज्याचा शोध लावण्यात एका भारतीयाचं योगदान होतं.

फायबर ऑप्टिक्स

रेडीओनंतर जी क्रांती माहिती संचाराची क्रांती सुरु झाली त्याला मुर्तरुप दिलं ते फायबर ऑप्टीक्सनं. पंजाबमध्ये जन्मलेल्या एका सामान्य कुटुंबातील भारतीयाच्या अथक प्रयत्नामुळं जगाला फायबर ऑप्टीक्स मिळू शकले आणि यामुळंच इंटरनेट क्रांतीचा डोलारा उभा राहू शकला. १९५५ ते १९६५ दरम्यान त्यांनी फायबर ऑप्टीक्स संबंधी अनेक रिसर्च पेपर प्रकाशित केले. यामुळं पुढच्या काळाची दिशा बदलली. आज संपूर्ण जग इंटरनेटद्वारे जोडलं गेलंय. या जोडणीचा दुआ फायबर ऑप्टीक्स असून एका भारतीयामुळं हे संशोधन जगासमोर आलं.

फायबर ऑप्टीक्सच्या माध्यमातून साती समुद्रापारचे जग जवळ आणण्यात आले. फायबर ऑप्टीक्सहे गतीवान संदेश वहन करणारी यंत्रणा असल्यामुळं याचा फायदा अनेक मोठ्या संशोधनांना वास्तवात उतरवण्यासाठी झाला. आजच्या संपुर्ण इंटनेटचा डोलारा याच फायबर ऑप्टीक्सवर तरलेला आहे.

युएसबी पोर्ट

युनीव्हर्सल सिरीयल बस पोर्ट म्हणजेच ‘युएसबी’ यांच्या माध्यमातून आपल्याकडच्या सर्व मेमरी स्टोरेज डिव्हायसेस ना एकमेकांशी जोडणं शक्य आहे. याच्या निर्मितीच संपूर्ण श्रेय जातं अजय भट्ट या भारतीयाला. त्यांच्या या शोधामुळं फ्लॉपी डिस्क आणि सीडी प्लेअर सारख्या किचकट माहिती संग्रह करणाऱ्या गोष्टींपासून आपली सुटका झाली. कॉम्प्युटरशी कनेक्ट होण्याचं सर्वात प्रभावी साधन युएसबी बनलं. हा शोध एका भारतीयानं लावला आहे हे जगाला फार उशीरा कळालं. २००९ ला या संशोधनावर प्रकाश पडला. याला कारण होती इंटेलची जाहिरात. पुढं २०१३ साली त्यांनी ‘युरोपीयन इन्व्हेंडर अवॉर्ड’ या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

विकसनशील देश म्हणून आज भारताची ओळख असली तरी भारतीयांनी वर्तमानात केलेल्या संशोधनामुळं जगाचा चेहरा मोहरा बदलला हे मान्य करायला हवं. आजही संपूर्ण जगातील आयटी क्षेत्र भारतावर अवलंबून आहे. आपल्याला याचा अभिमान असायला हवा.

सदरील माहिती पुस्तक, वर्तमान, इंटनेटवरील स्त्रोतांमधून संकलीत केलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button