…तर फक्त सोशल मीडियावर मंत्रिपदाचा उल्लेख पुसून होणार नाही; राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

aaditya Thackeray & Nilesh Rane

मुंबई : माजी शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Naryan Rane) यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (Shivsena) तीव्र शब्दांत टीका केली आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर राणे यांनी खालच्या पातळीवर टीका केली आहे.

‘शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर फक्त सोशल मीडियावर मंत्रिपदाचा उल्लेख पुसून काही होणार नाही… खरा पुरुष असशील तर राजीनामा दे आणि बाजूला हो.’ अशा शब्दांत निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून मंत्रिपद काढून टाकल्याने निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.

दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून मंत्रीपद काढून टाकल्याने निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER