… म्हणून नेते तृणमूल सोडत आहेत, ममतांची साथ सोडणाऱ्या आमदाराने सांगितले कारण

So the leaders are leaving the Trinamool, said the MLA who left Mamata

कोलकाता : गेल्या काही महिन्यांपासून ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसचे नेते – कार्यकर्ते पक्षसोडून भाजपात जात आहेत. असेच, ममतांची साथ सोडणारे आमदार शीलभद्र दत्ता यांनी याबद्दल सांगितले की पक्षाच्या आजच्या स्थितीसाठी ममतांचे राजकीय चाणक्य प्रशांत किशोर, ममता दीदीचे भाचे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) आणि दीदी घेत असलेले निर्णय कारणीभूत आहेत.

पक्षफुटीची सुरुवात

सुवेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेस युवाचे अध्यक्ष होते. त्यांना शह देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी युवा नावाची आणखी एक संघटना स्थापन केली आणि त्याचे अध्यक्षपद भाचा अभिषेककडे दिले. अभिषेक आणि सुवेंदू यांच्यात वाद होऊ लागले. ममता बॅर्जी यांनीच हे वाद सुरू केले होते. ममता दीदीच्या या धोरणामुळे पक्षांतर्गत कुरबुरी सुरू झाल्या आणि पक्षात असंतोष माजला.

सुवेंदूंना डावलणे

सुवेंदू अधिकारी पक्ष संघटना मजबूत करत होते. कोलकात्यामध्ये त्यांचे काम सुरू होते. पण, ममता बॅनर्जी त्यांना कोलकात्यात एकही कार्यक्रम घेऊ देत नव्हत्या. कोलकात्यामध्ये केवळ अभिषेक यांचे कार्यक्रम होतील, असा निर्णय ममताने घेतला होता. त्यामुळे सुवेंदू नाराज झालेत. पश्चिम बंगालमधील तरुण मोठ्या संख्येत सुवेंदू यांचे समर्थक आहेत.

आता तर ममताने अभिषेक बॅनर्जी यांना मुख्यमंत्री करण्याची तयार सुरू होती. मात्र, राज्यातील तरुण सुवेंदू यांचाच शब्द प्रमाण मानतात ही ममता दीदींसमोर अडचण होती. अभिषेक यांना सुवेंदू यांच्यासारखा जनाधार नव्हता.

म्हणून नेत्यांनी पक्ष सोडला

उत्तर बंगालमध्ये पक्षाची स्थिती अत्यंत वाईट होती. सुवेंदू यांच्याकडे पक्षबांधणीची जबाबदारी देण्यात आली. मग, त्यांना हटवण्यात आले.अरुप विश्वास यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर या भागात तृणमूल सर्व निवडणुका हारली. पक्षातला असंतोष उघड होऊ लागला. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी अभिषेक बॅनर्जी यांना नेता म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला. टीएमसीच्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांना भविष्यात आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले हे लक्षात आले आणि त्यांनी पक्ष सोडणे सुरू केले. अभिषेक यांना राजकारणाविषयी काहीच माहिती नाही. तृणमूलच्या या सर्व वाईट अवस्थेला ममता बॅनर्जी आणि प्रशांत किशोरच जबाबदार आहेत, असे शीलभद्र दत्ता म्हणतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER