… तर दिल्लीत कोरोनाची चौथी लाट; लॉकडाऊनचा विचार नाही- अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवासस्थानी तातडीची बैठक बोलाविली. या बैठकीनंतर दिल्लीत लॉकडाऊन केले जाणार नाही. देशासाठी कोरोनाची दुसरी लाट असू शकते; पण दिल्लीसाठी चौथी लाट आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, याला घाबरून जाण्याची गरज नाही. सरकार संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहे, असे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले. “या पार्श्वभूमीवर जी काही पावले उचलली पाहिजेत, ती उचलली जात आहेत. रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे, परंतु पूर्वीच्या प्रकरणांपेक्षा ही कोरोनाची प्रकरणे कमी गंभीर आहेत.

मात्र, मृत्यूची संख्या कमी आहे. रोज जवळपास ५० टक्के रुग्णांची नोंद होत आहे. होम आयसोलेशनमध्ये लोक चांगले उपचार घेत आहेत. सरकार कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन करण्याचा विचार करत नाही. भविष्यात लॉकडाऊन आवश्यक असल्यास चर्चा केली जाईल.” असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. “आजच्या बैठकीत रुग्णवाहिका, रुग्णालये, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि आयसीयू यावर चर्चा केली. संपूर्ण योजना तयार आहे. खाजगी व सरकारी रुग्णालयात बेड कधीही वाढवले  जातील. कोरोनाचा प्रसार होण्यापासून कसा रोखावा, चाचण्या, ट्रेसिंग आणि आयसोलेशन वेगाने केले जात आहे. कंटेनमेंट झोन तयार करून रोगाचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जाईल.” असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

केंद्र सरकारने १ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटांना लस घेण्यास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कम्युनिटी सेंटर, शाळांमध्ये लसीकरण मोहीम सुरू करू शकतो. याबाबत योग्य ती व्यवस्था करेल. जिथे ही लस घ्याल, तिथे रुग्णवाहिका, प्रथमोपचाराची व्यवस्था केली जाईल. सरकार याकडे लक्ष देईल, केंद्र सरकार राज्य सरकारांना त्यांच्या स्तरावर लसीकरण करण्यास परवानगी देईल, अशी आशा अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button