म्हणून भारताच्या पहिल्या वैमानिकाला देशद्रोही ठरवत इंग्रजांनी अटक केली होती

Maharashtra Today

१९३० उजाडलं आणि विमान वाहतूनक उद्योगानं जगभरात पाय मजबूत केले. त्या काळात छोटेखानी विमानांनी कमी पल्ल्याचा प्रवास केला जायचा. हळू हळू वैमानिकांनी वाहतूक व्यवसायात नवे प्रांत उलगडले. वैमानिकांमध्ये मोठी चढाओढ त्यावेळी सुरु होती. गती आणि अतंराचे वेगवेगळे रेकॅार्ड्स, किर्तिमान पायलटांनी आपल्या नावावर करवून घेतले. नव्या हवाई कंपन्या बाजारात दाखल होत होत्या.

त्याच काळात १९३०मध्ये पुरषोत्तम मेघाजी कबाली (Purshottam Meghaji Kabbali) यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवलं. कबालींची जगभरात ओळख पहिल्या भारतीय वैमानिकांच्या रुपात आहे. त्यांच्याआधी जेआरडी टाटांनी हवाई उड्डानाचा परवाना मिळवला होता पण व्यावसायिक रित्या वैमानिकाच काम करणाऱ्यांत कबाली यांनाच पहिल्या भारतीय वैमानिकाचा (first Indian pilot) बहूमान मिळाला.

१९३०ला कबाली यांनी इंग्लंडमध्ये व्हीटी- एएटी नावाच्या विमानाची खरेदी केली. त्यांची योजना होती की इंग्लंडच्या क्रॉयडनहून सुरुवात करत पॅरीस, रोम, ईरानहून कराचीपर्यंत प्रवास करायचा आणि विक्रम स्वतःच्या नावे करुन घ्यायचा. कराची त्यावेळी अखंड भारताचा भाग होता. इतक्या लांबचा प्रवास विमानानं पूर्ण करणं त्याकाळी मोठं आव्हानं होतं.

त्यांनी विमानाचं नाव ठेवलं ‘फेदर ऑफ द डॉन’ आणि त्या विमानातून प्रवासाला सुरुवात केली. उड्डान केल्यानंतर कबाली यांनी पॅरीस, रोम आणि टुनिस पार केलं. त्यांना तिथपर्यंत कोणतीच अडचण आली नाही, पण लिहियाच्या त्रिपोलीत त्यांना प्रवास थांबवावा लागला.

लिबीयाच्या टोब्रुक आणि त्रिपोलीच्यामध्ये ते वादळात अडकले. त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. नशिबानं त्यांना मोठी दुखापत झाली नाही. पण गंभीर दुखापत झाली. अपघातग्रस्त विमानाच्या तुकड्यांना ट्रकमध्ये भरुन बॉम्बे फ्लाइंग क्लब मुंबईत पोहचवण्यात आलं. कबालींनी त्यांचे मित्र बी.एस. दमानिया यांच्या देखरेखीत विमान दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला.

कबालींचं स्वप्न अर्धवट राहिलं पण विमान उड्डाणाची हौस पुर्ण करण्यात त्यांनी कसलीच कसर सोडली नाही. विमानाची दुरुस्ती झाल्यानंतर त्यांनी पुन्हा आकाशात झेप घेतली. आगामी वर्षात त्यांनी मुंबईच्या जुहूमध्ये खासगी विमानसेवा देणाऱ्या कंपनीत वैमानिकाची काही काळ नोकरी ही केली.

सत्याग्रहाच्या आंदोलनाची पत्रकं विमानातून सर्वत्र टाकली

जर्मनीतील जंकर्स फ्लूगसाईंग नावाचं विमान उड्डाण शास्त्राचे प्रशिक्षण देणाऱ्या एकमेव नामांकित संस्थेत त्यांनी विमानाचे उड्डाणाचे प्रशिक्षण १९२८ ते १९३० या कालखंडात पूर्ण केले. त्या संस्थेत प्रवेश घेणारे ते पहिले व एकमेव भारतीय विद्यार्थी होते. त्यांनी महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहाची प्रचारपत्रके विमानातून सर्वत्र टाकली.

देशद्रोही म्हणून अटक

विमानातून केलेल्या त्या प्रकाराबद्दल त्यांना देशद्रोही म्हणून अटक करण्यात आली. काही महिन्यांनी शिक्षा भोगून ते सुटले. पुढे त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना आपल्या विमानातून परदेशात नेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुण्याजवळ हडपसर येथे ग्लायडिंग क्लब काढण्यात आला. त्याची मुहूर्तमेढ व भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

भारतीय विमान सेवेचा इतिहास

भारतीय हवाई उद्योग अमेरिका आणि चीननंतर जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. १९३०च्या सुमारास या व्यवसायाला भारतात बळ मिळायला सुरुवात झाली. १९३२ला टाटांनी पहिली हवाई सेवा सुरु केली. जे. आर. डी. टाटांच्या दुरदृष्टीमुळं भारतात विमान सेवा क्षेत्रानं हातपाय पसरायला सुरुवात केली.

एअर इंडीयाची स्थापना १९४७ला करण्यात आली. टाटांनी सुरु केलेल्या विमान सेवेचंच नामकरण एअर इंडीया असं करण्यात आलं होतं. याच विमान सेवेनं पहिल्यांदां विदेशी विमान सेवा द्यायला सुरुवात केली. १९४८ला एअर इंडीयानं मुंबई ते लंडन ही पहिली विदेशी यात्रा पुर्ण केली.

१९५० पर्यंत भारतात दोन आणखी विमान सेवा देणाऱ्या कंपन्या सुरु झाल्या. हैद्राबादमधून ‘डेक्कन एअरलाइन’ तर कलकत्त्यातून ‘ कलिंगा एअर लाइन’.

१९५३ ला भारत सरकारनं विमान उद्योगाच्या राष्ट्रीयकरणाचे धोरण अवलंबले. सर्व छोट्या मोठ्य विमान सेवा देणाऱ्या कंपन्या दोन राष्ट्रीय कंपन्यात विलीन झाल्या. त्यांची नावं होती ‘एअर इंडीया’ आणि ‘इंडीयन एअरलाइन्स.’ यानंतर भारतात विमान सेवा व्यवसायानं मोठी प्रगती केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER